IRCTCची प्रवाशांसाठी नवीन ऑफर; पहिल्यांदा प्रवास, मग पेमेंट

IRCTCची प्रवाशांसाठी नवीन ऑफर; पहिल्यांदा प्रवास, मग पेमेंट

रेल्वने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध केल्या जात असतात. प्रवाशांची गैससोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आतापर्यंत विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. अशातच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने अनेक सणानिमित्त विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांमधील आरक्षणासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशनने प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. (indian railway irctc travel now pay later facility introduced by cashe)

रेल्वेच्या नव्या सुविधेनुसार, प्रवाशांना कोणतेही पैसे खर्च न करता रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. ‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ असे या सुविधेचे नाव आहे. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना खात्यात पैसे नसतानाही रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. प्रवाशांना ही सुविधा आयआरसीटीसीच्या Rail Connect अॅपवर मिळणार आहे.

प्रवाशांना ‘Travel Now Pay Later’ ची उपलब्ध करून देण्यासाठी आयआरसीटीसीने CASHe सोबत भागीदारी केली आहे. CASHe चा EMI पर्याय निवडून प्रवाशांना सहज तिकीट बुक करता येणार आहे. प्रवासी या तिकीटाचे पैसे 3 ते 6 महिन्यांच्या EMI पर्यायाद्वारे पेमेंट करू शकतात.

रेल्वेच्या या सुविधेमुळे देशभरातील करोडो रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे तत्काळ आणि नॉर्मल तिकीट बुकिंगसाठी ‘Travel Now Pay Later’ सुविधा उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेसाठी प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज भासणार नाही.


हेही वाचा – गोदरेज कंपनीमुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब; राज्य सरकारचा हायकोर्टात दावा

First Published on: October 18, 2022 9:46 PM
Exit mobile version