आषाढी वारीसाठी रेल्वे सज्ज! वारकऱ्यांसाठी ७२ विशेष गाड्यांची सोय

आषाढी वारीसाठी रेल्वे सज्ज! वारकऱ्यांसाठी ७२ विशेष गाड्यांची सोय

वारकऱ्यांसाठी रेल्वेच्या ७२ विशेष गाड्या

माझे माहेर पंढरी….अशा शब्दात विठ्ठल नामाचा गजर करत हजारो वारकरी दरवर्षी आषाढी वारीला जातात. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर माऊलीsssमाऊलीsssमाऊलीsssच्या जयघोषाने निनादुन जातं. आषाढी वारीसाठी आता रेल्वे प्रशासन देखील सज्ज झाले आहे. पंढरपूर येथे २३ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीसाठी रेल्वेने आता ७२ विशेष गाड्यांची सोय केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. वारकऱ्यांच्या सोयीसाठी आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून ७२ रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. अमरावती, खामगाव, सीएसएमटी, लातूर, मिरज- पंढरपूर आणि मिरज कुर्दूवाडीदरम्यान या गाड्या सोडण्यात येणार आहेत.

कुठून सुटणार गाड्या

नवीन अमरावती / खामगाव – पंढरपूर ही अनारक्षित विशेष रेल्वे गाडी ४ फेऱ्या मारणार आहे. ०११५५ डाऊन नवीन अमरावती – पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी १७ जुलै आणि २० जुलै या दिवशी दुपारी २ वाजता नवीन अमरावती येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.१५ ला पंढरपूरला पोहोचेल. ०११५६ ही विशेष गाडी १८ जुलै आणि २४ जुलैला ४ वाजता पंढरपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.४० वाजता नवीन अमरावती येथे पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मुर्तिझापूर, अकोला, शेगांव, जालंब, नादूंरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगांव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगवण, जेऊर आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

खामगाव – पंढरपूर ही अनारक्षित विशेष गाडी ४ फेऱ्या मारणार आहे. ०११५३ डाऊन खामगाव – पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी १८ जुलै आणि २१ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी खामगावहून सुटणार आहे. त्याच दिवशी ही गाडी ११.१५ ला पंढरपुरला पोहोचेल. ०११५४ अप पंढरपूर- खामगाव अनारक्षित विशेष गाडी १९ जुलै आणि २५ जुलै या दिवशी पंढरपूरहून ४ वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी खामगावला ८. ३० वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जालंब, नांदूरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगांव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगवण, जेऊर आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

सीएसएमटी-मिरज या गाडीच्या दोन फेऱ्या चालवण्यात येणार असून ०११५१ ही गाडी २२ जुलैला सीएसएमटीहून मध्यरात्री ००.२० वाजता सुटणार असून दु. ४.०५ वाजता मिरजला पोहचणार आहे. तसंच पंढरपुर-कुर्डूवाडीला – पंढरपूर या विशेष गाडीच्या १२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

First Published on: July 11, 2018 5:50 PM
Exit mobile version