Adani Pawar meet: उद्योगपती गौतम अदानी पवारांच्या भेटीला ‘सिल्व्हर ओक’वर

Adani Pawar meet: उद्योगपती गौतम अदानी पवारांच्या भेटीला ‘सिल्व्हर ओक’वर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काही तासांपूर्वीच वर्षा निवासस्थानी भेट झाली होती. शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर आता उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली आहे. गौतम अदानी यांची पवार आणि भाजपशी जवळीक नातं आहे. कारण याआधी देखील अदानी यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे ही भेटही अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे.

अदानी पवारांच्या भेटीला ‘सिल्व्हर ओक’वर

अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. हिंडनबर्ग रिपोर्टनंतर विरोधक अदानी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधकांनी जेपीसीची मागणी केली आहे. पण, या मागणीला पवारांनी गरज नसल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर अनेक चर्चाही सुरू झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट होत आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीमागचं कारण सांगितलेलं नाही. असं असताना अचानक गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. या भेटीमागचं नेमकं खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे या भेटीमागे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. ही फक्त सदिच्छा भेट होती आणि मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी ही भेट होती. तसेच या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं. मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शरद पवारांची सदिच्छा भेट – मुख्यमंत्री शिंदे

शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. ही फक्त सदिच्छा भेट होती आणि मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी ही भेट होती. तसेच या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं. मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : शरद पवारांची सदिच्छा भेट; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं ‘हे’ कारण

First Published on: June 1, 2023 8:36 PM
Exit mobile version