मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाणांचा पाहाणी दौरा

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाणांचा पाहाणी दौरा

आगामी गणेशोत्सव लक्षात घेता मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जाणार आहेत. कोकणात जाताना चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करावा लागतो. मात्र, या महामर्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. त्यामुळे या महामार्गावरील खड्डे आता बुजवण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी सकाळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहाणी केली. यावेळी त्यांनी लवकरात लवकर या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन दिले. (Inspection tour of Public Works Minister Chavan to plug potholes on Mumbai Goa highway)

“कोकणात पाऊस पडल्यामळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकणताली रस्त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी आम्ही कोकणातील लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करत आहोत. लवकरत की सुधारेल, परंतू गणपतीच्या काळामध्ये चाकरमनी मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात. त्यामुळे या चाकरमान्यांना वाहतुकीमध्ये अडथळे येत असून, त्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची या त्रासातून सुटका करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कोकणातील लोकप्रतिनिधींनी बैठक घेतली. या बैठकीनंतर आम्ही वेगळ्या एजन्सी आणि टेक्नोलॉजीच्या माध्यमातून खड्डे बुजवले जावू शकतात का, यावर चर्चा केली. कारण पाऊस सातत्याने पडत असल्याने खड्डे डांबरीकरण बुजवले तरी, परत उद्भवतात. त्यामुळे जागेवरच काही मटेरियल टाकून खड्डे बुजवता येतात का, याची तपासणी करत आहोत”, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटले.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नुकताच पार पडले. या अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या मुद्द्यावरून अधिवेशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकांम मंत्री यांनी विधानसभेच्या इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नाला उत्तर देतान येत्या 25 ऑगस्टपर्यंत बुजविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली.

याशिवाय, राज्य सरकारने नवी तारीख जाहीर केली आहे. डिसेंबर २०२३पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत केली. दरम्यान, या महामार्गावर झालेल्या अपघातात एक हजार 512 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, गेल्या १२ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे.


हेही वाचा – मराठा आरक्षण निवडसूचीतील 1 हजार 64 उमेदवारांची तात्काळ नियुक्ती; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

First Published on: August 26, 2022 8:36 AM
Exit mobile version