महाराष्ट्रात ईव्ही पॉलिसी आणली, त्याची जागतिक स्तरावर चर्चा : आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात ईव्ही पॉलिसी आणली, त्याची जागतिक स्तरावर चर्चा : आदित्य ठाकरे

मुंबईः महाराष्ट्रात ईव्ही पॉलिसी आणली त्याची जागतिक स्तरावर चर्चा आहे. महाराष्ट्रात ईव्ही पॉलिसी आल्यानंतर दीड लाखांहून ईव्ही गाड्या महाराष्ट्रात आहेत. पुण्याची ईव्ही सेल आहे, मुंबईची ईव्ही सेल आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत. माझी वसुंधरा पुरस्कार सोहळ्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते.

पर्यावरण आणि वातावरण बदल हे काम आता एका खात्यापुरतं राहिलेलं नाही. हे खातं सोडून इतर सर्व खात्यांचं काम वाढत चाललं आहे. ऊर्जा खाते असेल, ग्रामविकास खाते असेल, नगरविकास असेल, उद्योग आहे, ट्रान्सपोर्ट आहे या सगळ्या खात्यांचं काम म्हणजे पर्यावरण आणि वातावरण बदलाचं होत चाललंय. 80 हजार कोटींचे करार महाराष्ट्रासाठी घेऊन आलेलो आहोत. पहिल्यांदाच महाराष्ट्र मोठ्या संख्येनं रिप्रेझेंट झाला, पुढच्या वेळी अजून मोठ्या संख्येनं जाऊ. 16 देशांमधल्या 24 कंपन्या होत्या, असंही आदित्य ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

महाराष्ट्रात ईव्ही पॉलिसी आणली त्याची जागतिक स्तरावर चर्चा आहे. महाराष्ट्रात ईव्ही पॉलिसी आल्यानंतर दीड लाखांहून ईव्ही गाड्या महाराष्ट्रात आहेत. पुण्याची ईव्ही सेल आहे, मुंबईची ईव्ही सेल आहे. महाराष्ट्रात साडेबारा कोटी जनता आहे, त्यातून साधारणपणे सहा ते साडेसहा कोटी जनता ही आपल्या शहरांमध्ये राहते. महाराष्ट्रात उद्योग देखील तेवढेच आहेत. आपल्या देशाचं आर्थिक पाठबळही तेवढंच आहे. आपलं महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार

येत्या 15 जून रोजी ते अयोध्येला जाणार असून त्यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्याकरता शिवसेनेचे १५ नेतेही अयोध्येला जाणार आहेत. यामध्ये मंत्री एकनाथ शिंदे, वरूण सरदेसाई यांचाही समावेश असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. 15 जूनला रामलल्लाचं दर्शन घेऊन आदित्य ठाकरे शरयू किनारी आरती करतील अशी माहितीही राऊतांनी दिली आहे.


हेही वाचाः ‘रामलल्लांचे दर्शन प्रत्येक हिंदूने घेतले पाहिजे’; मनसेच्या अविनाश जाधवांचा थेट अयोध्येतून विरोधकांवर निशाणा

First Published on: June 5, 2022 1:49 PM
Exit mobile version