मुंबई पालिकेचे कंत्राटदार बिपीन मदानींच्या घरावर ITची धाड

मुंबई पालिकेचे कंत्राटदार बिपीन मदानींच्या घरावर ITची धाड

मुंबईमध्ये सकाळपासूनच आयकर विभागाने धाड सत्राला सुरूवात केली आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यानंतर आता मलबार हिल परिसरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई महापालिकेचे कंत्राटदार बिपीन मदानी यांच्या घरात आयकर विभागाने धाड टाकली आहे.

मुंबई पालिकेचे कंत्राटदार बिपीन मदानी यांच्या घरावर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली आहे. बिपीन मदान घरात नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. चार तासांपेक्षा जास्त वेळ ही चौकशी करण्यात आली. मात्र, आयकर विभागाचं धाडसत्र कधीपर्यंत सुरू राहणार हे पाहणं महत्त्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आजआयकर विभागाने छापेमारी केली. मागील ५ वर्षांपासून यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली असून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर कोट्यवधी रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. तसेच यासंबंधीत पुरावेदेखील सोमय्यांनी आयकर विभागाच्या हाती दिले होते. त्यामुळे यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यासाठी आयकर विभागाला मदत करणार असल्याचे सोमय्या म्हणाले.


हेही वाचा : Yashwant Jadhav IT Raid : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी ITची धाड, नेमकं काय आहे प्रकरण?


 

First Published on: February 25, 2022 4:36 PM
Exit mobile version