मी कुणाच्या गोठ्यात बांधला जाणारा ठाकरे नाही – जयदेव ठाकरे

मी कुणाच्या गोठ्यात बांधला जाणारा ठाकरे नाही – जयदेव ठाकरे

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला सुरूवात झाली असून ठाकरे आणि शिंदे गटाकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होेत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याला हजेरी लावली होती. तेव्हा मी कुणाच्या गोठ्यात बांधला जाणारा ठाकरे नाही, असं जयदेव ठाकरे म्हणाले.

मी कुणाच्या गोठ्यात बांधला जाणारा ठाकरे नाही

ठाकरे लिखित काही घेऊन येत नाही. एकनाथ शिंदे हे माझे आवडीचे नेते आहेत. आता तर ते मुख्यमंत्री झाले आहेत म्हणून त्यांना आता एकनाथराव बोलावं लागेल. पाच ते सहा दिवसांपासून मला फोन येत आहेत. तुम्ही शिंदे गटात गेलात काय?, अरे मी कुणाच्या गोठ्यात बांधला जाणारा ठाकरे नाही. असं दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र जयदेव ठाकरे म्हणाले.

असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला हवाय

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून दोन-चार भूमिका घेतल्या होत्या, त्या फार चांगल्या घेतल्या होत्या. त्या भूमिका मला खरचं आवडल्या. असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला हवाय. त्यामुळे मी त्यांच्या प्रेमासाठी येथे आलो आहे.

हेही वाचा : अडीच वर्षात तुम्ही हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे तुकडे केले, शहाजी बापू पाटलांचा ठाकरेंना टोला

आपला एक इतिहास आहे. चिपळ्या वाजवणारा एकनाथ ते आता मध्यंतरी एकनाथ झाले. त्यांना जवळच्या लोकांनीच संपवलं. ह्यांना एकटं पाडून देऊ नका. हा एकटा नाथ होऊन देऊ नका. हा एकनाथच राहुद्या. अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे.

हे सर्व बरखास्त करून शिंदे राज्य आणा

एकनाथ शिंदे हे गोरगरिब आणि शेतकऱ्यांची कामं करत आहेत. शेतकरी हा राबकरी असतो. तो राबतो म्हणून आपल्या पोटात दोन दाणे जातात. तसेच एकनाथ शिंदे हे राबकरी, कष्टकरी आणि मेहनत करणारे आहेत. यांना दुरावा देऊ नका. हे सर्व बरखास्त करून शिंदे राज्य आणा, असं जयदेव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : …पण शेवटी ते शिपाईच राहिले, भास्कर जाधवांचा राणेंवर प्रहार


 

First Published on: October 5, 2022 8:17 PM
Exit mobile version