घरताज्या घडामोडीअडीच वर्षात तुम्ही हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे तुकडे केले, शहाजी बापू पाटलांचा ठाकरेंना टोला

अडीच वर्षात तुम्ही हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे तुकडे केले, शहाजी बापू पाटलांचा ठाकरेंना टोला

Subscribe

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला सुरूवात झाली असून शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होत आहे. या मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी जोरदार भाषण ठोकत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अडीच वर्षात तुम्ही हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे तुकडे केले, असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कोणती शिवसेना?

- Advertisement -

हे भगवं वादळ जर उद्धव ठाकरेंनी बघितलं तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कोणती शिवसेना आहे. याचा दाखला आता तुम्हाला सांगावा लागणार नाही. व्यासपीठावर असलेल्या प्रत्येक आमदार, खासदार, मंत्र्याने सांगितलं होतं की, ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही भाजपा आणि शिवसेनेचं सरकार बनवू. निवडणूक झाल्यानंतर मतमोजणी झाली. १०६ भाजप आणि ५६ शिवसेना आले. आम्ही आनंदाने याठिकाणी मुंबईत आलो. परंतु येथे आल्यानंतर सर्व बिघडाबिघडी सुरू झाली, असं शहाजी बापू पाटील म्हणाले.

अडीच वर्षात तुम्ही हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे तुकडे केले

- Advertisement -

मी काँग्रेस असताना सुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची दसऱ्याची सभा मी नेहमी ट्विव्हीतून ऐकत होतो. दाऊदचा हस्तक बाळासाहेब ठाकरे कोणाला बोलले होते, असं म्हणत शरद पवारांवर टीका केली. एक घाव दोन तुकडे तुम्ही सामनाच्या माध्यमातून लिहित आहात. अडीच वर्षात तुम्ही हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे तुकडे केले आहात. आता कुणाचे आणि कशाचे तुकडे करत आहात?, असा सवाल शहाजीबापू पाटील यांनी उपस्थित केला.

गुलाबराव पाटलांना एक विनंती करतो की, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करावा आणि सांगा की, येथे येऊन बघा. त्यानंतर तुम्हाला कळेल खरी शिवसेना कुठली आहे, असं शहाजी बापू पाटील म्हणाले.

फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला

आज गद्दारी केली असं तुम्ही म्हणताय, त्यावेळी महाराष्ट्राने तुम्हाला शाबासकी दिली होती काय?, भाजपसोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत जो खंजीर खुपसला. ते महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही. मला त्याचा विश्वास आहे. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलात.

रक्ताने असलेले वारसदार म्हणून त्या निष्ठेने बोलण्याचा तुम्हाला सर्व अधिकार आहे. हिंदुहृदयसम्राटांच्या कुटुंबातील एक घटक म्हणून आज देखील तुमचा आम्हाला सन्मान आहे. मी तुमचा द्वेष करणार नाही. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली नसून झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त घेण्यासाठी धाडसाने उचललेलं एक पाऊल आहे.


हेही वाचा : नागपूरमधील तीन भ्रष्टाचार प्रकरणं, सुभाष देसाईंनी भर मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांची कुंडलीच मांडली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -