गिरिश बापटांच्या खात्याची जबाबदारी जयकुमार रावल आणि विनोद तावडेंकडे

गिरिश बापटांच्या खात्याची जबाबदारी जयकुमार रावल आणि विनोद तावडेंकडे

गिरिश बापट

पावसाळी अधिवेशना अगोदर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असे त्यांनी रंगशारदा येथील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. फक्त कधी होणार ही जरी तारीख मुख्यमंत्र्यांनी सांगितली नसली तरी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

विस्ताराआधी केलेत काही बदल

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गिरीश बापट खासदार झाल्यामुळे त्यांच्याकडे असलेली पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून, चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेली जळगावच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एवढेच नाही तर खासदार गिरीश बापट यांच्याकडे असणारी संसदीय कामकाजाची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गिरीष बापट यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खातं जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आली आहे.

महाजन यांची जबाबदारी वाढली

गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांचे सर्वात विश्वासू मंत्री असून, त्यांचे भाजपामधील सध्या वजन वाढले आहे. त्यामुळेच गिरीश महाजन यांच्या कामाचा आवाका बघता त्यांच्याकडे अजून एका जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे महाजन यांच्याकडे आता जळगाव आणि नाशिक या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपामध्ये वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या महाजनांवर आता आणखी एक जबाबदारी वाढली आहे.

हेही वाचा – 

‘गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील हे अंतराळ तंत्रज्ञानी’

First Published on: June 7, 2019 4:35 PM
Exit mobile version