सरकार पडत नसल्यामुळे वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे कारवाई, जयंत पाटील यांचा केंद्रावर निशाणा

सरकार पडत नसल्यामुळे वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे कारवाई, जयंत पाटील यांचा केंद्रावर निशाणा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार नामोहरण करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे. सरकार पडत नाही यामुळे वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करुन नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. नेत्यांवर यंत्रणांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे परंतु राजकारण्यांवर कारवाई करण्यात येते असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणा भ्रष्टाचारांच्या आरोपांवर कारवाई करत आहेत. जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारला नामोहरण करण्यासाठी आणि सरकार पडत नाही म्हटल्यावर बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे. आणि अलिकडच्या काळात प्रत्येकावर धाडसत्र टाकण्याचा प्रयत्न वेगवेगळी माहिती काढून करत असतात. खर म्हणजे ईडी असेल किंवा आयटी असेल त्यांनी केंद्रीय सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी ज्यांनी काळाबाजार केला, ज्यांच्याकडे अवैध संपत्ती आहे. अशांचा मागे लागले पाहिजे परंतु या संस्था राजकारणातील लोकांच्या मागे लागले आहेत. खाजगी लोकांना मोकाट स्वैराचार करायला परवानगी आहे. पण राजकारण्यांचा मागचा इतिहास काढायचा आणि त्याच्यावर बोट ठेवायचे काम हे सध्याचे केंद्र सरकार करत आहे. भारतातील लोकांना जाणीव झाली असेल असे जयंत पाटील म्हणाले.

विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी यंत्रणांचा वापर

केंद्रीय यंत्रणांचा वापर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करण्यासाठी आणि नेत्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी करण्यात येत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. भाजपकडून राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचाही आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. केंद्रीय यंत्रणांच्या वापरावरुन देशातील जनतेला जाणीव झाली असेल की भाजपकडून विरोधकांना टार्गेट करण्यात येत आहे.


हेही वाचा : जरंडेश्वरचा मालक कोण?, सोमय्यांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं उत्तर


 

First Published on: October 22, 2021 4:22 PM
Exit mobile version