संभाजी भिंडेच्या ‘त्या’ विधानावर कारवाईचे जयंत पाटील यांचे संकेत

संभाजी भिंडेच्या ‘त्या’ विधानावर कारवाईचे जयंत पाटील यांचे संकेत

कोरोनामुळे जी माणसे मरतात, ती जगायच्या लायकीची नाहीत असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिंडे केले होते. भिडे यांनी कोरोनाच्या मोहीमेविरोधात जे शब्द वापरले त्याचा समाचार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे. भिडे यांचे विधान म्हणजे समाजाच्या कोरोनाविरोधातील लढाईविरोधातील आहे. म्हणूनच त्यांचे विधान तपासून कारवाई करण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. अशा विधानांमुळे राज्य सरकार आणि समाजाकडून कोरोना नियंत्रणासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्या प्रयत्नांना रोखण्यासारखा हा प्रकार आहे. म्हणूनच कोरोनाचे संकट गंभीर असतानाच असे बोलणे करून लोकांना वेगळ्या दिणेने नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जे लोक आंबा खाल्ल्यावर मुलगा होतो, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून कोरोना विरोधातील लढाईविरोधात अशी विधाने येतात. हे गंभीर असल्याचे जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झालेली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण होऊन गेली आहे. अशातच कोरोनाविरोधी बेजाबदार वक्तव्ये येणे म्हणजे समाजाला दुसऱ्या दिशेने नेण्याचा प्रकार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्यामुळेच अशी विधाने तपासण्याची गरज असल्याचे जयंत पाटील म्हणाले. ही विधाने तपासून त्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही जयंत पाटील यांनी यावेळी दिल्या. अशा विधानांना कायद्याच्या दृष्टीने तपासून काय कारवाई करता येते याची माहिती घेण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या. समाजाच्या विरोधात जी व्यक्ती काम करते, अशा व्यक्तीविरोधात कारवाईची गरज असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले. कोरोनाचे संकट गंभीर आहे, त्यामुळेच राज्यात अशी बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या. तसेच सांगली आणि मिरज येथील व्यापाऱ्यांनाही संपाचा पवित्रा घेऊ नये असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळेच संपाचा पवित्रा घेऊ नये असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

काय म्हणाले होते संभाजी भिडे ?

मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायकीची नाहीत. कोरोना फक्त एका विशिष्ट प्रवृत्तीच्या लोकांना होतो. त्यामुळे कोरोना हा एक मानसिक आजार असल्याचे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले होते. कोरोनाच्या निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात बंड करावे, असेही आवाहन संभाजी भिडे यांनी केले होते. शासनाचे निर्णय घातकी असून, व्यापारी माती मोल झाले आहेत. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही, असेही संभाजी भिडे म्हणाले.


 

First Published on: April 11, 2021 2:42 PM
Exit mobile version