पाहा जयंत पाटलांचं विधानसभेतच झिंग झिंग झिंगाट!

पाहा जयंत पाटलांचं विधानसभेतच झिंग झिंग झिंगाट!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील

माजी अर्थमंत्री जयंत पाटील म्हणजे एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यातच त्यांचे विधानसभेतील अर्थसंकल्पावरील भाषण हे नेहमीच लक्षवेधी असते. त्यात ते नेहमीच त्यांच्या भाषणात वेगळा प्रयोग करत सरकारी कारभाराचे वाभाडे काढत असतात. आजही त्यांनी ‘झिंग झिंग झिगाट’ या प्रसिद्ध गाण्याचे विडंबन करत सरकारवर जोरदार प्रहार केला. जयंत पाटील यांनी विधानसभेत केलेलं विडंबनात्मक गाणं पुढीलप्रमाणे होतं…

उरात होतीये धडधड, सत्ता जायची वेळ आली,
डोक्यात गेलीये हवा, ही युतीची बाधा झाली…

झालंय झिंग झिंग झिंगाट,
झिंग झिंग झिंगाट,
झिंग झिंग झिंगाट…

चल क्लीनचिट देऊया, अन पैशे उडवूया,
उडताय रावसाहेब, पळतोय गिरीश, इलेक्शन आलया…!

आत्ता उतावीळ झालो, नेते फोडाया लागलो..,
तुझ्या नावाच मी कुंकू, माझ्या कपाळी लावलं,
अयोध्येवरून आलोया…..लै दुरून आलोया….,
शेतकरी आंदोलन करतोया, अन आम्ही मजा बघतोया !
समद्या पक्षात, म्या लै जोशात, रंगात आलोया…

समद्या राज्याला झालीया, आपल्या युतीची ही घाई,
कधी होणार तू सेना, आमच्या आमदारांची आई…. !
रोजगार गेलाया.., शेतकरी कंगाल झालाया,
आता तराट झालुया, तुझ्या घरात आलूया..
लय फिरुन बांधावरून, कल्टी मारून आलोया …!
आता इलेक्शन खेळूया…, अन २८८ जिंकूया…,
कारण मशीन आपलंच हाय रर..!! काय चिंतेचं कारण न्हाय..!

झालंय झिंग झिंग झिंगाट,
झिंग झिंग झिंगाट,
झिंग झिंग झिंगाटजी

सभागृहात जयंतराव पाटील यांनी सादर केलेल्या गाण्याने जोरदार ह‌शा पिकलाच शिवाय त्यांनी विडंबनात्मक गाणं सादर करुन सरकारच्या सद्यस्थितीवरही भाष्य केलं. यापूर्वी देखील जयंत पाटील यांनी ‘सोनु तुझा माझ्यावर भरोसा नाय काय’ हे विडंबनात्मक गीत सभागृहात सादर करुन सरकारवर जोरदार टीका केली होती.

पाहा जयंत पाटलांची ‘क्रिएटिव्ह कविता’!

First Published on: June 24, 2019 6:55 PM
Exit mobile version