‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो ठाण्यात राष्ट्रवादीने पाडला बंद

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो ठाण्यात राष्ट्रवादीने पाडला बंद

ठाणे: ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा ‘ शो ‘ ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवियाना मॉल मधील चित्रगृहात रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्रवेश करत बंद पाडला. याप्रसंगी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी तिकिटीचे पैसे मिळावे, अशी मागणी लावून ठरली. याचदरम्यान प्रेक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याचेही पाहण्यास मिळाले.

छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा दिला होता. याचदरम्यान सोमवारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केला, असा आरोप आव्हाडांनी केला होता. तर महाराजांच्या विरोधात असे चित्रपट यापुढे दाखवायचे नाही असा इशारा त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. ज्या प्रक्षेकाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, यावेळी त्या प्रक्षेकाला त्याच्या सोबत असलेल्या महिलेला आमदार आव्हाड यांनी चित्रगृहातून बाहेर नेले.

मनसेने केली शो सुरू करण्याची मागणी

राष्ट्रवादीने आंदोलन करत, शो बंद पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी विवीयाना मॉल येथे धाव घेतली. तसेच बंद पडलेला शो सूरु करण्याची मागणी केली. तसेच प्रेक्षकांना मारहाण करणे चुकीचे असून मारहाण करणाऱ्यांवर अटकेची कारवाई करावी अशी मागणी केली आहे, तसेच शो बघूनच येथून जाणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. कोणाला यायचे त्याने यावे आणि शो बंद करून दाखवावा असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.


हेही वाचा : आमचं लक्ष्य पुढचे 15 दिवस महाराष्ट्राचं दु:ख जाणून घेणे आहे – राहुल गांधी


 

First Published on: November 7, 2022 11:03 PM
Exit mobile version