घरताज्या घडामोडीआमचं लक्ष्य पुढचे 15 दिवस महाराष्ट्राचं दु:ख जाणून घेणे आहे - राहुल गांधी

आमचं लक्ष्य पुढचे 15 दिवस महाराष्ट्राचं दु:ख जाणून घेणे आहे – राहुल गांधी

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल झाली आहे. यावेळी राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींचे मनापासून स्वागत केले. राहुल गांधी यांनी नांदेडच्या देगलूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करुन महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी सर्व लोकांना संबोधित केलं. दरम्यान, या यात्रेचं लक्ष्य भारताला जोडण्याचं आहे. आमचं लक्ष्य पुढचे 15 दिवस महाराष्ट्राचं दु:ख जाणून घेणे आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

तेलंगणाहून आमच्यासोबत आलेले नेते आणि मागे असणारी गर्दी यांचेही मी आभार मानतो. या यात्रेला दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारीपासून सुरूवात झाली होती. आता ही यात्रा जम्मू-काश्मिर आणि श्रीनगरमध्ये जाऊन थांबणार आहे. या यात्रेला कोणत्याही प्रकारची शक्ती रोखू शकत नाही. काहीही होऊ दे, वादळ जरी आलं तरी ही यात्रा श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा झेंडा फडकावणार आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

भारताला एकत्र आणणं हे या यात्रेचं लक्ष्य आहे. आज भारतात पसरवत असलेल्या द्वेष, क्रोध आणि हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी ही यात्रा आहे. यात्रेत आम्ही मोठी भाषणं करत नाही. सकाळी ६ वाजता यात्रेला सुरूवात होते. तेव्हा जो कोणी व्यक्ती आमच्यासोबत बोलण्यास इच्छुक असतो मग तो शेतकरी, कामगार, मजूर, युवा, व्यापारी किंवा वरिष्ठ नागरिक असो.., त्यासाठी आमचे दरवाजे आणि आमचं मन कायम खुलं आहे. आमचं लक्ष्य पुढचे 15 दिवस महाराष्ट्राचं दु:ख जाणून घेणे आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, देशात बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. हा देश आपल्या तरूणांना रोजगार देऊ शकत नाही ही भारताची सत्यता आहे. एकीकडे भारतात बेरोजगारी वाढत आहे तर दुसरीकडे महागाईमध्ये देखील वाढ होत आहे. पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे छोटे व्यापारी, शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे. देशातील फक्त दोन टक्के नागरिकांना सरकार फायदा पोहोचवत आहे, असंही गांधी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल, कार्यकर्त्यांच्या हाती धगधगत्या मशाली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -