होय, मी बैल खायचो; जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वाद उद्भवणार

होय, मी बैल खायचो; जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वाद उद्भवणार

आमदार जितेंद्र आव्हाड

जळगावः राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या एका विधानानं पुन्हा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. आपण उघडपणे सांगतो की बैल खायचो, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्यांना डिवचलं आहे. जितेंद्र आव्हाड हे जळगावात गेले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. जोपर्यंत राम गांधींचा होता, तोपर्यंत राम तत्त्वज्ञानी होता. आता राम भलत्यांच्याच हातात गेलेला आहे. तो आता सत्तेचा आणि सत्ता मिळवण्याचं कारण ठरत आहे, असंही जितेंद्र आव्हाडांनी अधोरेखित केलंय.

विशेष म्हणजे दिल्लीत झालेल्या मांसाहारावरही त्यांनी भाष्य केलंय. आमच्या रक्तात शाकाहार नाही. बोकड आणि मटण खाल्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. डाळ खाऊन कोणी अंग मेहनत केल्याचे जगात कोणी ऐकलं आहे काय. गोवंश हत्या बंदी आणली गेली. मात्र, गायी आणि म्हशीचे मांस मुस्लिम, ख्रिश्चन आणि आम्ही कोणी खात नाही, पण उघड पणाने सांगतो आपण बैल खायचो, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.


बैल खायचो कारण मटण महाग असल्यानं परवडत नव्हते. बैलाचे मटण हे चार चार दिवस गरिबांच्या घरात शिजवले जायचे. आता मटण सातशे रुपये प्रतिकिलोवर गेल्याचंही त्यांनी सांगितलं. डाळ खाऊन कोणी अंग मेहनत केल्याचे जगात कोणाला माहिती नाही. गोवंश हत्या बंदी आणली गेली. मात्र, गायीचे मांस मुस्लिम, ख्रिश्चन व आम्ही कोणी खात नाही. म्हशीचे मांस मुस्लिम, ख्रिश्चन व कुणीच खात नाही, पण उघड पणाने सांगतो आपण बैल खायचो, असंही त्यांनी सांगितलं आहे.


हेही वाचाः gunratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, सदावर्तेंचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा

First Published on: April 13, 2022 5:55 PM
Exit mobile version