… नाही तर विचार करावा लागेल; धमकीच्या क्लिपवरून आव्हाडांचा सरकारला इशारा

… नाही तर विचार करावा लागेल; धमकीच्या क्लिपवरून आव्हाडांचा सरकारला इशारा

संग्रहित छायाचित्र

 

मुंबईः माझ्याकडे अनेक ऑडिओ क्लिप आहेत. बघूया सरकार काय करतंय ते, नाही तर आम्हाला विचार करावा लागेल, असा धमकी वजा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व त्यांच्या कुटुबियांना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप मध्यंतरी व्हायरल झाली होती. हा मुद्दा आमदार आव्हाड यांनी विधानसभेत मांंडला. ऑडिओ क्लिपचा मागोवा घ्यायचा झाल्यास पहिली माझ्या मुलीची हत्या करण्याचा कट रचला जात होता. आता ही ऑडिओ क्लिप त्याच्या घरात बसून केली होती. त्यात मुलाने कबुली दिली आहे की मी घरात बसून ऑडिओ क्लिप केली आहे. दारू पिऊन मुख्यमंत्र्यांना कॉल केल्याचा उल्लेखही त्यात आहे. काही अधिकाऱ्यांची नावेही त्यात घेतली गेली आहेत, असे आमदार आव्हाड यांनी सांगितले.

पुढे आमदार आव्हाड म्हणाले, आज पुन्हा काही ऑडिओ क्लिप बाहेर आल्या आहेत. जितेंद्र आव्हाड आज काही तरी करणार असे त्यांना समजले होते. जितेंद्र आव्हाड काही तरी करणार म्हणजे ते सभागृहातील भाषण होतं. मी स्वतःला गोळ्या झाडून घेईन आणि पोलिसांना जाऊन सांगेन की जितेंद्र आव्हाडने माझ्यावर गोळी झाडली, असेही त्या ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारावर होणाऱ्या हल्ल्याबाबत संवेदनशीलपणे चौकशी करायला हवी. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की मी आयुक्तांशी बोलतो. आमचे आयुक्त घाबरत आहेत. माझ्याकडे अनेक ऑडिओ क्लिप आहेत. बघूया सरकार काय करतय ते नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशाराही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

या विषयावर सर्व सभागृहाने एकत्र यायला हवे. स्वप्निल कोळीच्या कपाटात आजही कोट्यवधी रुपये आहेत. जिल्हाधिकारी यांना हाताशी धरून ते धंदे करत आहेत. बायकोचे खोटे बायोमॅट्रीक करुन त्याने चार चार फ्लॅट घेतले आहेत. राधिका अंधारे यांची चौकशी लागली होती. ही चौकशी बंद झाली, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

First Published on: March 15, 2023 4:52 PM
Exit mobile version