पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल 1 फेब्रुवारीपासून बंद

पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल 1 फेब्रुवारीपासून बंद

राज्यात कोरोना हळूहळू नियंत्रणात येताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर अनेक निर्बंध शिथिल केले जात आहेत. पुण्यातील रुग्णसंख्येतील वाढ कमी झाल्यामुळे आता पूर्व प्राथमिक शाळा म्हणजेच नर्सरी ते सीनिअर केजी २ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २८ फेब्रुवारीपासून पुण्यातील जम्बो हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अजित पवार म्हणाले की, बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्व प्राथमिक शाळा, ज्याला आपण नर्सरी ते सीनिअर केजी म्हणतो. त्या शाळा २ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यासंदर्भात शिक्षण विभागाने सुरक्षितपणे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्याचे पालन करायचे आहे. त्यामुळे ज्या पालकांना आपल्या मुला-मुलींना नर्सरी ते सीनिअर केजीमध्ये पाठवायचे आहे, ते पालक २ मार्चपासून पाठवू शकतात.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे बेड्सची कमतरता निर्माण झाली होती. म्हणून नाईलाजास्तव मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये आपण मोठे जम्बो हॉस्पिटल उभे केले होते. पुण्यात सीओईपीच्या मैदानावर जम्बो हॉस्पिटल उभारण्यात आले होते. एकंदरीत रुग्णसंख्या पाहता आता जम्बो हॉस्पिटलची गरज वाटत नाही. त्यामुळे २८ फेब्रुवारीपासून जम्बो हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

First Published on: February 27, 2022 2:57 AM
Exit mobile version