Karnataka Hijab Controversy: ‘पहले हिजाब, फिर किताब’; कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद

Karnataka Hijab Controversy: ‘पहले हिजाब, फिर किताब’; कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद

Karnataka Hijab Controversy: 'पहले हिजाब, फिर किताब'; कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद

कर्नाटकातील काही विद्यार्थींनीना हिजाब परिधान केल्यानंतर वर्गात प्रवेश नाकारल्यामुळे हिजाब वाद पेटला आहे. कर्नाटकात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने विद्यार्थ्यांना शांतता पाळण्याचे आवाहन केले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी उद्या अडीच वाजता होणार आहे. दरम्यान कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. बीडमध्ये बॅनर्स लावून आणि मालेगावमध्ये मुस्लिम समाजातील महिलांनी आंदोलन करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.

कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद बीडमध्ये उमटले दिसले असून हिजाब समर्थनार्थ चौकात बॅनर्स लावण्यात आले आहेत. ‘पहले हिजाब, फिर किताब’ अशा आशयाचे हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर मालेगावात मुस्लिम समाजातील महिला रस्त्यावर उतरल्या. मालेगाव महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिला रस्त्यावर उतरून त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच काही काळ धरणे आंदोलन केले. यावेळी संतप्त महिलांनी घोषणाबाजी करून कर्नाटक सरकारचा निषेध केला. कर्नाटक सरकार संविधानातून दिलेल्या अधिकारावर गदा आणत असल्याचा आरोप महापौर ताहेरा शेख यांनी केला.

दरम्यान हिजाब वादामुळे कर्नाटकातील शाळा आणि कॉलेज पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आम्ही कर्नाटकच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. मी विद्यार्थ्यांना शांती आणि सलोखा राखण्याचे आवाहन करतो. तसेच विद्यार्थ्यांमध्ये कोणतेही वाद होऊ नये, असे मी शाळेच्या प्रशासनाला आदेश दिले आहेत.’


हेही वाचा – Karnataka Hijab Row: कर्नाटकमधला हिजाब वाद, नेमके काय आहे प्रकरण?


First Published on: February 8, 2022 6:27 PM
Exit mobile version