घरदेश-विदेशKarnataka Hijab Row: कर्नाटकमधला हिजाब वाद, नेमके काय आहे प्रकरण?

Karnataka Hijab Row: कर्नाटकमधला हिजाब वाद, नेमके काय आहे प्रकरण?

Subscribe

कर्नाटकमधील शाळा कॉलेजमध्ये सुरू असलेला हिजाब वाद अधिकचा चिघळला असून या वादाला धर्मिक रंग चढला आहे. हिजाबला विरोध दर्शवण्यासाठी कर्नाटकमधील अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थी भगवी टोपी आणि स्कार्फ घालून रस्त्यावर उतरले आहेत. तर काही ठिकाणी हिजाब घातलेल्या विद्यार्थीनींसमोर भगवी वस्त्रे घातलेले विद्यार्थी जय श्री रामच्या घोषणा देत आहेत तर हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थीनीही अल्ला हू अकबर अशा घोषणा देत आहेत. या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची ज्यादा कुमक ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहे. या घटनेचे व्हिडीओ पाकिस्तानमध्ये टि्वट केले जात आहे.

नेमके प्रकरण आहे तरी काय?

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमधील शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थींनींना हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. यास मुस्लीम विद्यार्थीनींनी विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे मुस्लीम विद्यार्थीनींच्या या मनमानीविरोधात अनेक विद्यार्थी एकत्र आले असून गळ्यात भगवा स्कार्फ आणि भगवी टोपी घालून याचा विरोध करत आहे. यामुळे कर्नाटकमध्ये धार्मिक वाद पेटण्याची चिन्हे आहेत. प्रकरण उच्च न्यायालायत पोहचले असून त्यावर सुनावणी सुरू आहे.

- Advertisement -

कर्नाटक सरकारने राज्यात Karnataka Education Act-1983 कलम 133 लागू केले आहे. यामुळे राज्यातील सर्व शाळा-कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश घालणे बंधनकारक आहे. यांतर्गत सरकारी शाळा आणि कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना नियमानुसार गणवेश परिधान करावे लागणार आहेत. तर खासगी शाळा कॉलेजेसलाही गणवेश निवड करावी लागणार आहे. यास मुस्लीम विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे.

गेल्या महिन्यात जानेवारीत उड्डपी मधील एका सरकारी कॉलेजमध्ये 6 विद्यार्थीनी हिजाब घालून कॉलेजमध्ये आल्या होत्या. यामुळे कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पण तरीही त्या विद्यार्थीनी हिजाब घालूनच कॉलेजमध्ये येत आहेत. यावरून हा वाद सुरू झाला असून विद्यार्थींनीं हिजाबचा संबंध धर्माशी असल्याचे सांगत आहेत. हे वादाचे मूळ कारण असून त्याचे पडसाद आता कर्नाटकातील इतर शाळा कॉलेजेसमध्येही उमटू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -