थकीत बिलांमुळे शाळांमधील वीजपुरवठा खंडीत करणार नाही, केसरकरांनी केलं आश्वस्त

थकीत बिलांमुळे शाळांमधील वीजपुरवठा खंडीत करणार नाही, केसरकरांनी केलं आश्वस्त

Maharashtra Assembly Budget 2023

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक बाबी सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनात महत्वाच्या असतात. त्यामुळे थकीत वीज बिलांसाठी अशा सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये. वीज बिलांसाठी या सार्वजनिक बाबींचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार वारंवार घडतात, त्यामुळे राज्य सरकारने या विषयी तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी केली. यावर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आश्वस्त केले की, कोणत्याही शाळेचे, आरोग्य केंद्राचे यापुढे वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकीत वीज बिलांसाठी खंडीत करण्याच्या घटना घडत आहेत. यासर्व बाबी या सार्वजनिक असून राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहेत. सार्वजनिक बाबींचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हे प्रकार वारंवार घडत असतात त्यामुळे सार्वजनिक बाबींचा वीज पुरवठा थकीत बीलासाठी खंडीत करु नये, त्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

याप्रश्नी चर्चा सुरू असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिक्षण मंत्र्यांना निर्देश दिले की सभागृहाला यासंदर्भात आश्वस्त करावं. त्याप्रमाणे यापुढे कोणत्याही शाळेचे वीज कनेक्शन तोडणार नसल्याचे दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं.

First Published on: March 23, 2023 12:19 PM
Exit mobile version