चलो दापोली रिसॉर्ट तोडो! अनिल परबांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी सोमय्यांचा दापोली दौरा

चलो दापोली रिसॉर्ट तोडो! अनिल परबांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी सोमय्यांचा दापोली दौरा

राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या पून्हा एकदा अॅटिव्ह मोडमध्ये आले आहे, सोमय्यांकडून वारंवार शिवसेनेतील नेत्यांवर टीका, आरोप केले जात आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांना सोमय्या टार्गेट करत आहेत. सोमय्या सातत्याने अनिल परब यांच्यावर दापोलीतील साई रिसॉर्टवरून आरोप करत आहेत. अनिल परब यांच्या मालकीचे कथित रिसॉर्टवर तोडक कारवाई करण्याची मागणी सोमय्यांनी केली. याच पार्श्वभूमीवर आज सोमय्या यांनी चलो दापोली अशी घोषणा केली आहे. सोमय्या आज खेड ते दापोली अशी पायी दौरा काढणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे रिसॉर्टचे बांधकाम केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या रिसॉर्टचे बांधकाम करताना सीआरझेडचे उल्लंघन झाल्याचा सोमय्यांचा दावा आहे. तसेच रिसॉर्ट खरेदी करताना बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. याप्रकरणी सोमय्यांनी दापोली जिल्हाधिकारी प्रशासनासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि ईडीकडे तक्रार केली. तसेच साई रिसॉर्ट खरेदीसाठी परब यांनी कुठून पैसै आणला याचा तपास करणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले.


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्ट पाडण्याचा आदेशावर स्वाक्षरी केल्याचा दावाही किरीट सोमय्या केला होता. तसेच परब यांचा रिसॉर्ट दिवाळीपर्यंत इतिहासजमा होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. यातच दापोली दौऱ्यासाठी सोमय्या आज सकाळी 7.55 वाजता ठाण्याहून खेडकडे रवाना झाले, सकाळी 11.48 वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्थानकात पोहचणार आहे. यासाठी खेड ते दापोलीपर्यंत ठिकठिकाणी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर मुरुड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साई रिसॉर्टला सोमय्या भेटणार आहे. यावेळी काही अधिकारी देखील पोहण्याची शक्यता आहे.


प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो रद्द; पोलिसांकडून परवानगीस विरोध


First Published on: August 27, 2022 11:05 AM
Exit mobile version