ठाकरे सरकारकडून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

ठाकरे सरकारकडून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

ठाकरे सरकारकडून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

ठाकरे सरकारचा माझा मनसूख हिरेन करण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल आणि गंभीर आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करुन केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा लावला आहे. ईडी, सीबीआय आणि आयकरला पुरावे देऊन मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे २ नेते तर शिवसेनेच्या ४ ते ५ नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईनंतर सोमय्या आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. सोमय्यांवर दौऱ्यांदरम्यान हल्ले करण्यात आले असल्यामुळे माझी हत्या करण्याचा डाव असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माझी हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा डाव असल्याचा आरोप केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या ५८ कोटींचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीविरोधात केलेल्या कारवाईमुळे आता त्यांच्या पोटात का दुखत आहे. मी कुठेही गेलो की, मुंबईवरुन गुंड पाठवतात, हत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमय्यांना झेड सुरक्षा प्रदान केली. त्यावर हे म्हणतात की, उसको निकाल डालो फिर इसको देखते है, म्हणजे किरीट सोमय्यांचा मनसुख हिरेन करायचा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाकडे जातो आणि सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट ज्यात तथ्य आहेत त्यांची बाजू घेतात. संजय राऊतांची मालमत्ता जप्त झाली. यशवंत जाधव यांची संपत्ती हजार कोटींच्या वर जाणार आहे. त्यांनीसुद्धा स्वतःच्या नावावर ३७ घरे घेतली आहेत. पण नातेवाईकांच्या नावावरसुद्धा मालमत्ता घेतली आहे. कंपनी मंत्रालयाने यशवंत जाधवांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. ईडीने तपास यंत्रणा कामाला लागली आहे. म्हणून घोटाळेबाज यशवंत जाधवांची चौकशी करणार आहेत.

पैसे लुटण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे डर्टी डझन करतात आणि एका पाठोपाठ एक नेत्यांवर कारवाई होणार, यशवंत जाधव, बिल्डरांवर कारवाई होणार सगळं बाहेर येणार आहे. महाविकास आघाडी सरकार समोर कोणी बोलणारे नव्हते परंतु आता साडेबारा कोटी जनतेचा आशीर्वाद पाठीशी असलेल्या किरीट सोमय्यांनी आवाज उठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचे आशीर्वाद आहेत असे सोमय्या म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी ५८ कोटींचा पुरावा द्यावा

माझे काहीही म्हणण नाही. आयएनएस विक्रांत मोहिम हा विषय नाही. संजय राऊतांकडे हिंमतच नाही. संजय राऊतांनी सांगितले सोमय्यांनी ५८ कोटी गोळा केले. माझ्यावर एफआयआर केली आहे. ५८ कोटींचे पुरावे द्या, पुरावा नसताना पोलीस गुन्हा दाखल करु शकत नाही. तुम्ही पुरावा द्या त्याशिवाय कलम कसे लावले आहेत. तक्रारदाराने कोणतेही पुरावे दिले नाही. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन तक्रार केली आहे. यानंतर संजय राऊतांनीसुद्धा आपल्याकडे पुरावे नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी पहिले पुरावे दिले पाहिजेत अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.


हेही वाचा : संजय राऊतांनंतर पुढचा नंबर ‘या’ मंत्र्याचा, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा

First Published on: April 8, 2022 11:13 AM
Exit mobile version