शिवसेनेचा कोकणातील आणखी एक नेता अडचणीत; ACB कडून चौकशी, 8 दिवसांची दिली मुदत

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे. सिंधुदुर्गातील उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने चौकशी केली आहे. एसीबीने तब्बल अर्धा तास चौकशी केली, यानंतर 20 वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांची मुदत दिली आहे.

वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान शुक्रवारी त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडून चौकशी झाली. यावेळी एसीबीने वैभव नाईक यांना 2002 ते 2022 या कालावधीतील उत्पन्नाची चौकशी केली. तसेच नाईक यांना उत्पन्नाचा तपशील देण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. या आठ दिवसात वैभव नाईक यांनी एसीबीकडे सर्व उत्पन्नाचा तपशील द्यायचा आहे.

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाई यांच्या मालमत्तेविषयी चौकशी केली. कणकवलीतील शासकीय विश्रामगृहात ही चौकशी झाली. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाकडून ही चौकशी करण्यात आली. यानंतर एसीबीने 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस दिली आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटातील अनिल परब यांच्यानंतर कोकणातील आणखी एक नेता तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला आहे.


फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्लांना क्लीनचिट? न्यायालयात पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर


First Published on: October 7, 2022 9:51 PM
Exit mobile version