लालबागच्या राजाचा प्रसादही मिळणार ऑनलाइन, ‘अशी’ नोंदवा ऑर्डर

लालबागच्या राजाचा प्रसादही मिळणार ऑनलाइन, ‘अशी’ नोंदवा ऑर्डर

मुंबई – संपूर्ण देशभरातून लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनासाठी भाविक येत असतात. काल मंगळवारी रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात होत असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लालबागच्या राजासाठी भलीमोठी रांगही लागली आहे. दरम्यान, ज्यांना लालबागच्या राजाचं दर्शन घेता येणार नाहीय, त्यांना लालबागच्या राजाच्या प्रसादाची चव मात्र चाखता येणार आहे. मुंबईसह संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर प्रसाद पोहोचवण्यासाठी जिओ मार्ट आणि पेटीएम यांच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी प्रसाद पोहोचवण्याची सुविधा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.


लालबागच्या राजाच्या दर्शनाप्रमाणेच प्रसादालाही फार महत्त्व आहे. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ऑनलाईन प्रसादाची सोय उपलब्ध करून दिली आहे. प्रसादाच्या ॲार्डर करीता https://lalbaugcharaja.com/online-prasad/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

जिओ मार्टकडून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातच प्रसाद पोहोचला जाईल. तर, पेटीएममार्फत मुंबईसह संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर प्रसाद पोहोचवला जाणार आहे.

First Published on: August 31, 2022 11:09 AM
Exit mobile version