लातूरमध्ये कार व एसटी धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू

लातूरमध्ये कार व एसटी धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू

कार आणि एसटी महामंडळाच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूर परिसरात घडली. तुळजापुरला देवीच्या दर्शनासाठी जाताना हा अपघात झाल्याचे समजते. लातूर-उदगीर रस्त्यावर हैबतपूर पेट्रोल पंपाजवळ कार व एसटी महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. (latur accident involving st bus and car near lohara five killed one injured)

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात कारमधील पाचजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत.

अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख व चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर अशी मृतांची नावे आहेत. तर प्रियांका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, उदगीर येथून कुटुंब कारने (MH 24 AB0 4080) सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास निघाले होते. या कारमधून 6 जण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते.

लातूर-उदगीर रस्त्यावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालवकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन धडकली.


हेही वाचा – माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण राहणार तुरूंगातच

First Published on: October 4, 2022 3:14 PM
Exit mobile version