राज्यातले  MBBS डॉक्टर पोहोचले लोकसभेत

राज्यातले  MBBS डॉक्टर पोहोचले लोकसभेत

भारतीय संसद भवन

सर्दी, ताप असो किंवा मोठ्यातला मोठा आजार असो. नेहमीच आपण बरे होण्यासाठी डॉक्टरकडे जात असतो. डॉक्टरकडे गेल्याशिवाय आपल्याला बरेही वाटत नाही. पण तुम्हाला माहित आहे का आता राज्यातले सात एमबीबीएस डॉक्टर दिल्लीत गेले आहेत. हे डॉक्टर दिल्लीत स्वत: गेले नाही तर त्यांना दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने पाठवले. विशेष बाब म्हणजे दिल्लीत गेलेले हे सात डॉक्टर साधेसुधे नाहीत तर एमबीबीएस आहेत. आता तुम्ही म्हणालं हे डॉक्टर आहेत तरी कोण आणि नेमके दिल्लीत तरी कशाला गेलेत. तर थांबा आम्ही सांगतो. नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून, देशासह राज्यात भाजपा प्रणित एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्रामध्ये युतीचा बोलबाला पहायला मिळाला असून, शिवसेना भाजपा युतीला ४१ जिंकण्यात यश आले असून, भाजपा २३ तर शिवसेनेचे १८ खासदार दिल्लीत गेले आहेत. मात्र या युतीच्या ४१ खासदारांपैकी निवडून आलेले पाच खासदार एमबीबीएस तर एक खासदार एमडी डॉक्टर आहे.

युतीचे हे एमबीबीएस खासदार दिल्लीत

डॉ. हिना गावीत या नंदुरबारमधुन भाजपाच्या तिकीटावर, डॉ. प्रितम मुंडे या बीडमधून भाजपाच्या तिकीटावर, डॉ. सुजय विखे पाटील अहमदनगरमधुन भाजपाच्या तिकीटावर, डॉ. सुभाष भामरे धुळ्यामधून भाजपाच्या तिकीटावर, डॉ. भारती पवार दिंडोरीमधून भाजपाच्या तिकीटावर, तर ठाण्यामधून शिवसेनेच्या तिकीटावर श्रीकांत शिंदे हे निवडुन दिल्लीत पोहचले असून, यातील प्रितम मुंडे या एम.डी डॉक्टर असून, इतर उरलेले पाच जण हे एमबीबीएस डॉक्टर आहेत.

राष्ट्रवादीचा एक खासदारही एमबीबीएस

दरम्यान शिरूर मतदार संघातून शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८ हजार २८७ मतांनी पराभव केलेले डॉ. अमोल कोल्हे हे देखील एमबीबीएस आहेत. त्यामुळे युतीच्या या निवडुन गेलेल्या या एमबीबीएस खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे. निवडणुकीच्या पहिल्याच दिवसांपासून रंगत आणलेल्या अमोल कोल्हे यांनी खरतर शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवत शिरूरची जागा खेचून देखील आणली. विशेष बाब म्हणजे युतीचे हे सहा एमबीबीएस डॉक्टर आणि आघाडीचा एक एमबीबीएस डॉक्टर राज्याच्या हितासाठी संसदेच आवाज उठवणार का हे येणारा काळच ठरवेल.

दरम्यान या सात एमबीएस डॉक्टर प्रमाणे राज्यातले आणखी एक असे एक डॉक्टर लोकसभेत पोहोचले असून, हे डॉक्टर जरी एमडी किंवा एमबीबीएस नसले तरी त्यांच्या नावाच्या पुढे डॉक्टर अशी पदवी लावली जाते. विशेष म्हणजे नावापुढे डॉक्टर, असे लावणाऱ्या डॉक्टरनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचाही पराभव केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिल कुमार शिंदे यांचा पराभव केलेले जय सिद्धेश्वर स्वामी  हे जरी एमबीबीएस डॉक्टर नसले तरी त्यांना बनारसच्या विश्व हिंदु विद्यालयातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे.


वाचा – १७ व्या लोकसभेत महाराष्ट्रातून १९ नवे चेहरे

वाचा – पंकजा मुंडे नंतर सुप्रिया सुळेंचीही वडिलांबद्दल भावनिक पोस्ट


 

First Published on: May 24, 2019 10:51 PM
Exit mobile version