घरमहाराष्ट्रपंकजा मुंडे नंतर सुप्रिया सुळेंचीही वडिलांबद्दल भावनिक पोस्ट

पंकजा मुंडे नंतर सुप्रिया सुळेंचीही वडिलांबद्दल भावनिक पोस्ट

Subscribe

बारामती लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत खासदार सुप्रिया सुळेंनी हॅटट्रीक साधली. विजयाची घोषणा झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुकवर वडील शरद पवार यांच्याबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याआधी काल पंकजा मुंडे यांनी देखील लोकसभेचा निकाल लागत असताना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल अशीच एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दोहोंचेही वडील लोकनेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. आपल्या विजयाचे श्रेय वडिलांना देऊ केल्यानंतर नेटीझन्सकडून या दोन्ही पोस्टचे कौतुक होत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी आपल्या वडीलांबद्दल एक कविता म्हटली आहे.

- Advertisement -

श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी;
लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!

असे या कवितेचे बोल आहेत. त्यानंतर या व्हिडिओमध्ये वडील शरद पवार यांच्यासमवेतचे सुप्रिया सुळे यांचे काही फोटो देखील दाखवण्यात आले आहेत.

- Advertisement -

श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!

Supriya Sule ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಮೇ 23, 2019

निवडणूक कोणतीही असो बारामती मतदारसंघ नेहमीच राज्यभरात चर्चेचा विषय असतो. या चर्चेला कारणीभूत असतात पवार कुटुंबीय. मात्र यंदा बारामती मतदारसंघावर सर्वच पक्षांचे विशेष लक्ष होते. भाजपने बारामती जिकांयचीच असा प्रण केला होता. तर राष्ट्रवादीकडून विजयाची हॅटट्रीक साधण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले. बारामतीचा किल्ला अभेद्य ठेवण्यात सुप्रिया सुळे यशस्वी झाल्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली ही पोस्ट आपला नेता आणि वडील यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत आहे.

भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील काल सोशल मीडियावर अशीच भावनिक पोस्ट शेअर केली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्व. गोपीनाथ मुंडे स्वतः निवडणूक लढवत होते. मात्र मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे अपघाती निधन झाले होते. यावेळी त्यांची कमतरता भासत असल्यामुळे लहानपणाचा एक फोटो शेअर करत पंकजा मुंडे यांनी मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला होता.

 

हे वाचा – पंकजा मुंडेना येतेय वडिलांची आठवण; लहानपणीचा ‘तो’ फोटो केला पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -