Lok Sabha Election 2024 : चंद्रकांत पाटलांची पदाधिकाऱ्यांना तंबी; म्हणाले, नकारात्मक बोलाल तर

Lok Sabha Election 2024 : चंद्रकांत पाटलांची पदाधिकाऱ्यांना तंबी; म्हणाले, नकारात्मक बोलाल तर

मावळ : लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप अनेक जागांवर युती-आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अशातच मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी आज समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना तंबी घातली. महायुतीच्या बैठकीत निगेटिव्ह बोलणाऱ्यांनी जेवून घरी जावं, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले. (Lok Sabha Election 2024 chandrakant patil maval lok sabha candidate shrirang barane campaign maharashtra)

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“ज्यांना निगेटिव्ह बोलायचे आहे, त्यांनी माझ्या कानात बोलावे. जाहीर निगेटिव्ह बोलणाऱ्यांनी तातडीने जेवणाचा मेनू पाहावा आणि जेवून घरी जाऊन बसावे. तसेच इथून बाहेर गेलात, तर मीडियामध्ये ही अजिबात निगेटिव्ह बोलायचे नाही. दिवसभर मीडियात दिसले की तुम्हाला मज्जा येते. यापेक्षा निगेटिव्ह बोलणाऱ्यांनी इथून जेवून तातडीने घरी जावे, मी त्यांना तशी परवानगी देतो आहे”, असं म्हणत पादाधिकाऱ्यांना चंद्रकांत पाटलांनी तंबी दिली.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : गुढीपाडव्याला होणार मविआच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात आयोजित बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. उदय सामंतांनीही पदाधिकाऱ्यांना सल्ला दिल्याचे समजते. त्यानुसार, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत, असे समजून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. उद्धव ठाकरेंनी कधीच कार्यकर्त्यांची दुःखं जाणून घेतली नाही. स्वताचा चेहराही कोणाला दाखवत नव्हते. मावळमध्ये सहाही आमदार महायुतीचे आहेत. या आमदारांच्या मताधिक्याची बेरीज केल्यास बारणे हे मागील वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील. गट-तट, मान – अपमान विसरून जा आणि मानसन्मान बाजूला ठेवून काम करावे”, असे आवाहन उदय सामंतांनी पदाधिकाऱ्यांना केले.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : …कारण माझ्याकडे पैसे नाहीत, पंकजा मुंडेंकडून प्रचार सभेत कार्यकर्त्यांना अनोखे आवाहन

First Published on: April 8, 2024 11:23 PM
Exit mobile version