घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : गुढीपाडव्याला होणार मविआच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

Lok Sabha Election 2024 : गुढीपाडव्याला होणार मविआच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

Subscribe

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत सर्व आलबेल असल्याचा संदेश देण्यासाठी उद्या मंगळवारी (ता. 09 एप्रिल) गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत आघाडीचे जागावाटप अधिकृतपणे जाहीर केले जाईल.

मुंबई : सांगली आणि भिंवडी लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये वाद कायम आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या अनुक्रमे या दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार घोषित केले आहेत. पण असे असले तरी काँग्रेसनेही या जागांवर आपला दावा कायम ठेवत मैत्रीपूर्ण लढत करण्याचा इशारा दिला आहे. (Lok Sabha Election 2024 Official announcement of seat allocation of MVA will be held Gudipadwa)

महाविकास आघाडीत सर्व आलबेल असल्याचा संदेश देण्यासाठी उद्या मंगळवारी (ता. 09 एप्रिल) गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत आघाडीचे जागावाटप अधिकृतपणे जाहीर केले जाईल. त्यामुळे काँग्रसने सांगली, भिंवडी मतदारसंघातून माघार घेतली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Congress : पक्षाला लागलेली गळती थांबेना, माजी मुख्यमंत्र्यांनीच सोडला काँग्रेसचा हात

महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सांगली, भिवंडीवर दावा ठोकला होता. मात्र, शिवसेनेने सांगलीत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भिवंडी मतदारसंघात आपला उमेदवार घोषित करून काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसने सांगली मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिवसेनेना तेथून आपला उमेदवार मागे घेण्यास तयार नाही. त्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाक् युद्ध रंगले होते.

- Advertisement -

जागावाटपाचा हा तिढा कायम असतानाच महाविकास आघाडीने उद्या सकाळी 11 वाजता मंत्रालयासमोरील शिवसेनेचे पक्ष कार्यालय असलेल्या ‘शिवालय’ येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड आदी नेतेमंडळी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंगळवारी गुढीपाडवा असून हा शुभ दिवस आहे. उद्या पत्रकार परिषद आहे, याच अर्थ महाविकास आघाडीतील सगळे किरकोळ वाद मिटले आहेत. आघाडीत कोणीही टोकाची भूमिका घेतलेली नाही. आघाडी एकत्र असून आमच्यात सर्व आलबेल आहे. आघाडीत काहीही बिघाडी नाही, हा संदेश देण्यासाठी उद्या संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. तसेच महाविकास आघाडीतील पुढील दिशा, झालेले जागावाटप, प्रचार यंत्रणा कशी राबवायची यासह अनेक गोष्टींसंदर्भात आघाडीचे नेतेमंडळी माहिती देणार आहेत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

आघाडी किंवा युतीमध्ये जागावाटपात एखाद-दुसऱ्या जागेवरुन कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडे झुकावे लागते. कार्यकर्त्यांची समजूत काढली की त्यातून मार्ग निघतो. काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात बोलले असले तरी ती कार्यकर्त्यांची भावना असते. शिवसेना कार्यकर्त्यांच्याही अशाच भावना होत्या, पण आम्ही त्यांना शांत केले. कार्यकर्त्यांचे मन राखणे, ही मोठी जबाबदारी असते, असेही संजय राऊत यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा… NCP SP : जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला राग अन् सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -