घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : ...कारण माझ्याकडे पैसे नाहीत, पंकजा मुंडेंकडून प्रचार सभेत...

Lok Sabha 2024 : …कारण माझ्याकडे पैसे नाहीत, पंकजा मुंडेंकडून प्रचार सभेत कार्यकर्त्यांना अनोखे आवाहन

Subscribe

बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांचे आव्हान आहे. पंकजा मुंडे यांनी प्रचार सभांचा धडाका लावला असून या सभांमार्फत आज त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना अनोखे आवाहन करण्यात आले आहे.

बीड : लोकसभा 2024 साठी भाजपाने बीड लोकसभेतून प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापत त्यांच्या बहिण पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊ केली आहे. पंकजा मुंडे यांनीही प्रचाराचा नारळ फोडला असून त्यांच्याकडून विजयी होण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहे. बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांचे आव्हान आहे. पंकजा मुंडे यांनी प्रचार सभांचा धडाका लावला असून या सभांमार्फत आज त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना अनोखे आवाहन करण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024 Pankaja Munde appeal to BJP Party Workers)

बीडमधील एका प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी सर्वात आधी बीडमध्ये घर बांधायाला सुरुवात करणार आहे. मला तुम्ही जागा घेऊन दिली तर मी बीडमध्ये घर बांधेन, कारण माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही सर्वांनी वर्गणी काढून जागा घेऊन दिली तर मी तिथे भूमीपूजन करेन, पहिली कुदळ मारेन आणि तुमच्याच नावावर घर बांधेन. त्यानंतर मरेपर्यंत तिथे राहीन. आपण बीडमध्ये छान घर बांधू, असे आवाहन पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 202 : आंबेडकरांना प्रेशर कुकर, तर जानकरांना मिळाली शिट्टी; निवडणूक आयोगाकडून चिन्हाचे वाटप

तसेच, आष्टी, गेवराई आणि बीड मतदारसंघात कामे असतील तेव्हा मी बीडमधल्या घरात राहीन तर केज, माजलगाव आणि परळी मतदारसंघात कामे असतील तेव्हा मी परळीत मुक्काम करेन. मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देते. या घरांमध्ये राहीन आणि येथूनच तुमच्याबरोबर संपर्कात राहीन. मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देतेय, मतदारांना नाही. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी इथे राहण्याचा माझा मानस आहे. मला इथल्या लोकांनी खूप माया आणि प्रेम दिले आहे. मी देशात आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी या प्रेमाची तुलना होऊ शकत नाही. कोणतीही संपत्ती या प्रेमाची बरोबरी करू शकत नाही, असेही पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : कारलं कडू ते कडूच राहणार…, म्हणीतून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -