Lok Sabha 2024 : राजकारणातील पुतना मावशीचे सोंग घेणाऱ्या…, चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार

Lok Sabha 2024 : राजकारणातील पुतना मावशीचे सोंग घेणाऱ्या…, चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार

मुंबई : रशियात ज्‍या पद्धतीने राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सत्तासूत्रे एकट्याच्‍या हाती घेतली आहेत, ती पाहताना आपल्‍या देशात नवीन पुतिन तयार होतो की काय, ही चिंता भेडसावू लागली असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावरून, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. (Lok Sabha Election 2024: Chandrasekhar Bawankule’s counter attack on Sharad Pawar)

अमरावती लोकसभा मतदारासंघात मविआकडून काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी आज, सोमवारी संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक सभागृहात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. देश हा संसदीय लोकशाही पद्धतीने चालावा, यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोठे योगदान दिले. पण, रशियात ज्‍या पद्धतीने राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सत्तासूत्रे एकट्याच्‍या हाती घेतली आहेत, ती पाहताना आपल्‍या देशात नवीन पुतिन तयार होतो की काय, ही चिंता भेडसावू लागली आहे, असे शरद पवार म्हणाले.

या सभेतून शरद पवारांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावरही निशाणा साधला. अमरावतीत 2019 च्‍या निवडणुकीच्‍या वेळी आमच्‍याकडून मोठी चूक झाली. नवनीत राणा यांना मतदान करा, असे आवाहन आम्‍ही त्‍यावेळी केले होते. पण, पाच वर्षांत त्‍यांनी काय केले, हे लोकांसमोर आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha : पाच वर्षांपूर्वी माझ्याकडून चूक झाली, त्यासाठी माफी मागतो; शरद पवारांनी का मागितली माफी?

याला प्रत्युत्तर देताना, भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पुतना’ मावशीचे सोंग घेणाऱ्या शरद पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात ‘पुतिन’ दिसायला लागले आहेत. शरद पवार यांचे विखारी राजकारण जनतेने अनुभवले. त्यामुळेच सुज्ञ मतदारांनी त्यांना नाकारले. आताही मतदारांचा ‘मोदी की गॅरंटी‘वर विश्वास आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ‘पुतिन-पुतिन‘ करत पवार यांनी रडगाणे सुरू केले, असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे.

शरद पवार यांनी मोदी यांना कितीही नावे ठेवली तरी पालघर साधू हत्याकांड, गोवारी हत्याकांड, मावळमधील शेतकऱ्यांवर केलेल्या अमानुष गोळीबाराच्या निमित्ताने दिसलेला पवार यांचा उग्र चेहरा मतदार कधीच विसरणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींची पुतिनशी तुलना, म्हणाले…


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 22, 2024 10:04 PM
Exit mobile version