घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींची पुतिनशी तुलना, म्हणाले...

Lok Sabha 2024 : शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींची पुतिनशी तुलना, म्हणाले…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करत त्यांची तूलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी केली आहे.

अमरावती : रशियात ज्‍या पद्धतीने राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सत्‍तासूत्रे एकट्याच्‍या हाती घेतली आहेत, ती पाहताना आपल्‍या देशात नवीन पुतिन तयार होतो की काय, ही चिंता भेडसावू लागली आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवारांनी मोदींची तुलना पुतिनशी केल्याने आता राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Lok Sabha Election 2024 Sharad Pawar compares PM Narendra Modi with Vladimir Putin)

मविआकडून काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी आज सोमवारी (ता. 22 एप्रिल) संत ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक सभागृहात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. देश हा संसदीय लोकशाही पद्धतीने चालावा, यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोठे योगदान दिले. पण, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहरूंविषयी चुकीची माहिती देतात. 10 वर्षांची सत्‍ता हाती असताना आपण काय केले, ते सांगत नाहीत. अन्‍य लोकांवर टीका करण्‍यात ते वेळ घालवतात, असा टोला त्यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा… Jitendra Awhad : जेव्हा सांगण्यारखे काही नसते तेव्हाच…; जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधानांवर टीका

तसेच, भाजपाचे अनेक खासदार हे नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्‍यासाठी देशाचे संविधान बदलण्‍याची भाषा उघडपणे बोलत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलविण्‍याची ताकद कोणातही नाही. पण, राज्‍यघटना बदलली पाहिजे, अशी इच्‍छा बाळगणाऱ्या लोकांच्‍या हाती सत्‍ता आली तर, देशाची संसदीय लोकशाही अस्‍ताला जाईल, अशी भीती देखील शरद पवारांनी व्यक्त केली.

- Advertisement -

2019ला आमची चूक झाली…

या सभेतून शरद पवारांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावरही निशाणा साधला. अमरावतीत 2019 च्‍या निवडणुकीच्‍या वेळी आमच्‍याकडून मोठी चूक झाली. नवनीत राणा यांना मतदान करा, असे आवाहन आम्‍ही त्‍यावेळी केले होते. पण, पाच वर्षांत त्‍यांनी काय केले, हे लोकांसमोर आहे. गेल्‍या वेळी केलेली चूक दुरूस्‍त करण्‍यासाठी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना निवडून द्यावे लागणार आहे, असे आवाहन यावेळी शरद पवारांकडून अमरावतीमधील नागरिकांना करण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : सांगलीत आता तिरंगी लढत; विशाल पाटलांनी महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -