घरमहाराष्ट्रLok Sabha : पाच वर्षांपूर्वी माझ्याकडून चूक झाली, त्यासाठी माफी मागतो; शरद...

Lok Sabha : पाच वर्षांपूर्वी माझ्याकडून चूक झाली, त्यासाठी माफी मागतो; शरद पवारांनी का मागितली माफी?

Subscribe

पाच वर्षांपूर्वी माझ्याकडून एक चूक झाली होती आणि त्यासाठी मी आज माफी मागतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

अमरावती : महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती येथे प्रचारासाठी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचे नाव न घेता टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी मी इथे अपक्ष खासदाराला पाठिंबा  दिला होता. त्या खासदारासाठी मी मते मागितली होती. पण त्यावेळी माझ्याकडून चूक झाली होती आणि त्यासाठी मी आज माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024 Sharad Pawar apologized in Amravati)

अमरावती मतदारसंघात भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवार म्हणाले की, आज मी अमरावतीकरांची माफी मागायला आलो आहे. कारण पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी याठिकाणी काही सभा घेतल्या होत्या. त्यावेळी लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठींबा दिला होता, त्यांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिले. पण गेल्या पाच वर्षांत निवडून दिलेल्या खासदारांचा अनुभव बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती. त्यामुळे मला सतत वाटायचे की, अमरावतीकरांची माफी मागावी. त्यांना सांगावं आमच्याकडून चूक झाली आहे आणि ती चूक आता पुन्हा कधी होणार नाही. यासाठी ज्याचं सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवन स्वच्छ आहे, अशा बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे, असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीवरही टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : ठाकरे गटाचे भास्कर जाधव गेले कुठे? गीतेंच्या प्रचाराला गैरहजेरी

शरद पवार म्हणाले की, देशाची सत्ता गेली दहा वर्षे नरेंद्र मोदींच्या हातात आहे. पण यापूर्वी मी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानांबरोबर काम केले आहे. गेल्या 56 वर्षांत मी अनेकांना जवळून पाहिले असून त्या सर्वांच्या कामाची पद्धतही पाहिली आहे. ते लोक देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे, भाषणं करायचे. नवा भारत कसा उभा राहील, लोकांचा आत्मविश्वास कसा वाढेल, यासाठी काम करायचे. पण आताचे पंतप्रधान कुठेही गेले की, पहिल्यांदा माजी पंतप्रधान जवाहर लाल नेहरू आणि काँग्रेसवर टीका करताना दिसतात. त्यांना माहीत नाही की, स्वातंत्र्यासाठी जबाहरलाल नेहरू यांनी 18 वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. स्वातंत्र्यानंतर देश लोकशाही पद्धतीने कसा चालवावा यासाठी रचणा केली होती. त्यामुळे नेहरू यांचे योगदान कोणीही पुसू शकत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींना सुनावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ज्यांना बरीच मुले आहेत त्यांना…, पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -