Lok Sabha 2024 : दिवसा स्वप्न पाहणाऱ्यांना…, नवनीत राणांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

Lok Sabha 2024 : दिवसा स्वप्न पाहणाऱ्यांना…, नवनीत राणांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

दिवसा स्वप्न पाहणाऱ्यांना..., नवनीत राणांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

अमरावती : महायुतीकडून भाजपातर्फे अमरावती लोकसभेच्या उमेदवार असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अमरावतीत येणार आहे. ज्यामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले आहे. याचबाबत बोलण्यासाठी नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पण यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. (Lok Sabha Election 2024 Navneet Rana mocked Rahul Gandhi)

काहीजण राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगत आहेत, असा प्रश्न महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना विचारला असता, त्या म्हणाल्या की, ज्याप्रमाणे दिवसा स्वप्न पाहिली जातात, त्याप्रमाणे ते दिवसा स्वप्न पाहात आहेत. पण केवळ दिवसा स्वप्न पाहणाऱ्यांना राहुल गांधी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे वाटत आहे. पण उघड्या डोळ्यांना पाहिलेली स्वप्न कधीच पूर्ण होत नसतात, ही गोष्ट काँग्रेसने लक्षात घेतली पाहिजे. पंतप्रधान मोदींची आज जगभरातील कामगिरी पाहता त्यांच्या नेतृत्त्वाशी राहुल गांधी यांची तुलना होऊच शकत नाही, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : माझ्या पराभवासाठी विरोधकांचा अमरावतीत ठिय्या, राणांचा खोचक टोला

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. रशिया युद्धावेळी ज्याप्रकारे आमची मुले झेंडे घेऊन बाहेर पडली, तेव्हा मोदींची ताकद कळाली. आज पाकिस्तान जो शांत बसला आहे, त्यामागेही पंतप्रधान मोदी आहेत. पंतप्रधान मोदी हे जगभरात काम करत आहेत. ते शेवटच्या नव्हे तर पहिल्या रांगेत आहेत. देशात मोदींची हवा आहे. त्यामुळे आमच्यासमोर कोणतेही आव्हान नाही. देशात मोदींची हवा होती, आहे आणि कायम राहील, असेही नवनीत राणा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज बुधवारी (ता. 24 एप्रिल) अमरावतीत येणार आहे. ज्यामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले आहे. पण अमित शहा यांची ज्या मैदानात सभा होणार आहे, ते मैदान बच्चू कडू यांना त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी न मिळाल्याने मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून आता पुन्हा राणा आणि कडू यांच्यामध्ये जुंपली असून नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : गृहमंत्री अमित शहांनीच कायदा तोडला, त्यांनी…; बच्चू कडूंचा हल्लाबोल

First Published on: April 24, 2024 12:26 PM
Exit mobile version