घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : गृहमंत्री अमित शहांनीच कायदा तोडला, त्यांनी...; बच्चू...

Lok Sabha Election 2024 : गृहमंत्री अमित शहांनीच कायदा तोडला, त्यांनी…; बच्चू कडूंचा हल्लाबोल

Subscribe

गृहमंत्री अमित शहा यांनी कायदा तोडला. त्यांनी सभा इथे न घेता दुसरी घ्यायला पाहिजे होती, असं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

अमरावती : गृहमंत्री अमित शहा यांनी कायदा तोडला. त्यांनी सभा इथे न घेता दुसरी घ्यायला पाहिजे होती, असं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रितसर पैसे भरून परवानगी घेत सायन्सकोर मैदान बूक केलं. त्याला पोलिसांची परवानगी मिळाली. मात्र, अचानक पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे बच्चू कडू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अमरावतीच्या लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 Bacchu Kadu Slams Union Home Minister Amit Shah And Amravati Lok Sabha Candidate Navneet Rana)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा आज (24 एप्रिल) सभा घेणार आहे. या सभास्थळावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये मंगळवारी बाचाबाची झाली. बच्चू कडू यांनी सायन्सकोर मैदानावर सभेसाठी परवानगी घेतली असताना आता त्यांना सभास्थळी जाण्यापासून पोलिसांनी अडवलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी बच्चू कडूंना अडवलं. यानंतर बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

- Advertisement -

“गृहमंत्री अमित शहा यांनी कायदा तोडला. त्यांनी सभा इथे न घेता दुसरी घ्यायला पाहिजे होती. विशेष म्हणजे आम्हाला पहिला परवानगी मिळते. त्यावेळी त्यांना (राणा) नाकारालं जाते. त्यानंतर त्यांना (राणा) यांना परवानगी मिळते आणि आम्हाला नाकारलं जातं. त्यामुळे ही घटना अतिशय निषेधार्थ आहे. कायद्याच्या राज्यात असं झालं तर, लोकांपुढे जाणारा संदेश अतिशय वेगळा जाईल. अगोदरच लोकांना भीती आहे आणि भीतीच्या वातावरणात लोकांना अशा दडपशाहीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण होईल. मला अनेकांचे फोन आले. कार्यकर्त्यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला”, असे बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार; राहुल गांधी आणि अमित शहा आज पश्चिम विदर्भात

- Advertisement -

“भाजपाची ही संस्कृती नाही. भाजपची संस्कृती स्वाभिमान पक्ष पूर्ण संपवत आहे. विचित्र पद्धतीने भाजपाल घेऊन जात आहे. काय जादूटोणा स्वाभिमान पक्षाने भाजपवर केला, म्हणजे एकेकाळी जादुटोणा करून घुमराह करण्याचे काम केले जात होते. तशी अवस्था आता भाजपची आहे”, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली. शिवाय “न्यायप्रीय लोकांनी नेहमीच न्यायाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. प्रत्येक घटनेवर नेहमी जात, धर्म पाहिला तर न्याय राहणार नाही. जी न्यायप्रीय लोकं आहेत, ते या घटनेचा विचार करतील”, असे म्हणत मविआच्या नेत्यांचे बच्चू कडूंना आभार मानले.

याशिवाय, “आम्ही 26 तारखेचा विचार करतोय. जनता या सगळ्याचा न्याय देईल. निवडणुकीपूर्ता नाही पण आता खरी लढाई सुरू झाली आहे. जिथे रोज अवैध काम सुरू आहे. रोज 3 कोटींचा जुगार चालतो. असे अनेक धंदे अमरावतीत सुरू आहेत. अशाप्रकराची संस्कृती अमरावतीत आणण्याचा प्रयत्न असेल तर, त्या विरोधात आम्ही नक्कीच लढू”, असे म्हणत बच्चू कडूंनी इशारा दिला आहे.

“आम्ही प्रत्येक गावा-खेड्यात जाऊन सभा केल्या. जवळपास 100 सभा आम्ही केल्या. आम्ही सभा घेऊन लोकांसमोर विचारांची मांडणी केली. शेतकरी, आशासेविका, संगणक परिचालक अशा सर्व कर्मचाऱ्यांशी आम्ही बातचीत केली. त्यावेळी काही छोटे-छोटे व्यापर भविष्यात कसे डुबणार आहेत याबाबत आम्ही माहिती दिली. अदानी-अंबानी कशाप्रकारे मोठा खेळ खेळणार आहेत, हे सुद्धा आम्ही सांगितले. बाजारसमितीतील व्यापारी सुद्धा भविष्यात धोक्यात येणार आहेत. अशी माहिती आम्ही लोकांना दिली. आम्ही इतक्या सभा घेतल्या, त्यावेळी आम्हाला अजिबात पैसे द्यावे लागले नाहीत. लोकं स्वत: आली. त्यामुळे नवनीत राणा यांना पराभव दिसत होता म्हणून त्यांनी हा गेम केला”, असा हल्लाबोलही बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर केला.


हेही वाचा – LOK SABHA 2024 : हिंदू-मुस्लीम दंगल घडू शकते म्हणून माघार घेतली; त्या घटनेवर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -