घरमहाराष्ट्रकोकणLok Sabha 2024 : रोज टोप घालताना विचार करावा लागतो आज कोणत्या...

Lok Sabha 2024 : रोज टोप घालताना विचार करावा लागतो आज कोणत्या पक्षात; उद्धव ठाकरेंची राणेंवर टीका

Subscribe

लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : समोर जो उभा आहे, त्याला रोज टोप घालताना विचार करावे लागते. डोकं खाजवायला मिळतं. पण टोप घातल्यावर मिळत नाही. तेव्हा डोकं खाजवत विचारतात की आज आपण कोणत्या पक्षात आहोत. कारण आठवतंच नाही काल कोणत्या पक्षात होते आणि आज कोणत्या पक्षात आहेत, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray Slams Narayan Rane In Konkan)

लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

“समोर जो उभा आहे, त्याला रोज टोप घालताना विचार करावे लागते. डोकं खाजवायला मिळतं. पण टोप घातल्यावर मिळत नाही. तेव्हा डोकं खाजवत विचारतात की आज आपण कोणत्या पक्षात आहोत. कारण आठवतंच नाही काल कोणत्या पक्षात होते आणि आज कोणत्या पक्षात आहेत. इतके वर्ष स्वतासकट स्वत:ची पिलावळ जिथे सत्ता असते, तिकडे तुम्ही झुकतात. सगळी मंत्रीपद आमदारकी, खासदारकी घेतली पण एकतरी लघू किंवा सूक्ष्म तुमच्या साईजचा उद्योग कोकणात आणला का तुम्ही? मला वाटतं भाजपने हुशारीने त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणेच लघू आणि सूक्ष्म दिलं. आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावा लागेल. कारण अतिसूक्ष्म होतील. म्हणजेच कोरोनाचा जिवाणू दिसेल पण हे दिसणार नाहीत. इतके अतिसूक्ष्म होतील”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजप उमेदवार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कोकणात प्रत्यक्ष मोदी उभे राहिले तरी…, संजय राऊतांचा निशाणा

- Advertisement -

“आज गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघाले आहेत. पण उपस्थित सर्वजण जिवालाजीव देणारे माझे शिवसैनिक ज्यांना बाळासाहेबंनी जोडलेले आहे. ही माझी वडिलोपार्जित कमाई आहे आणि गर्व त्याचा मला अभिमान आहे. मोदी घराणेशाही या लोकांना मंजूर आहे. पण पंतप्रधानांना शिवसेनेची घराणेशाही यांना मंजूर नाही. तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नकोय हिंदूहृदयसम्राटांची घराणेशाही तुम्हाल नको आहे, पण गुंडांची, गद्दारांची घराणेशाही तुम्हाला हवी आहे. हे दु:ख जरी आम्हाला-तुम्हाला वाटत नसलं तरी, अटलजींना वाटत असेल”, अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी म्हणाले की यांना मत म्हणजे त्यांना मत म्हणजे या दोघांचे साटंलोटं झालं तर कोकणात त्यावेळी शिवसेना उभी राहिली नसती, तर आज कोकणात गुंडराज चालली असती. भाजपचे इथले लोकं काहीच करू शकणार नाहीत. कल्याणमधील भाजपच्या आमदार गणपत गायकवाड याने त्यांच्या (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) विरोधात पक्षश्रेष्टींकडे तक्रार केली. पण त्यांचे ऐकले नाही. त्यांने थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला. मी त्या गोष्टींचे समर्थन करत नाही. पण त्याने म्हटलं की, जोपर्यंत शिंदेंच्या हाती सत्ता राहिल तोपर्यंत या राज्यात गुंडाराज सुरू राहिल”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

“त्यांचे सरकार आल्यानंतर ते कोकणात बारसूची रिफायनरी तुमचा विरोध डावलून उभी करतील. पण मी तुम्हाला वचन देतो की, आपलं इंडिया आघाडीचे सरकार आणणार म्हणजे आणणारच. त्यावेळी बारसू असो किंवा जैतापूर असो एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही. नुसता आणणार नाही तर, सरकारी कागदावरून सुद्धा तो प्रकल्प हटवून टाकीन हे माझे तुम्हाला वचन आहे”, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

“भाजपचे लोक विनाशाचा प्रचार करत आहेत. कारण आम्ही विकासाच्या गोष्टी करत आहोत, तर तुम्ही विनाशाच्या गोष्टी करत आहात. ते म्हणतात की यांना मत म्हणजे मोदींना मत. पण मी सांगतो की यांना मत म्हणजे विनाशाला मत. एकाबाजूला विनाश आहे तर, दुसऱ्या बाजूला विग्नहर्ता विनायक आहेत. तुम्ही निवडा तुम्हाला काय पाहिजे. काजू, आंब्यांसह इतरांवर निर्यातबंदी हे कितीकाळ आपण सहन करायचे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : देशाच्या राजकारणातील आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग – उद्धव ठाकरे

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -