घरताज्या घडामोडीAaditya Thackeray : बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची त्यांची लायकी नाही; आदित्य ठाकरेंचा...

Aaditya Thackeray : बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची त्यांची लायकी नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

मला वाटतं जे पळाले, कोणत्या स्थितीत पळाले, कशासाठी पळाले, जॉइन ऑर जेल पॉलिसीमध्ये जे पळाले. ज्यांनी सतत रड गाण गायलं आणि स्वत:ला वाचवण्यासाठी पळाले, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव घेण्याच्याही लायकीचे नाही आहेत, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला.

कोल्हापूर : मला वाटतं जे पळाले, कोणत्या स्थितीत पळाले, कशासाठी पळाले, जॉइन ऑर जेल पॉलिसीमध्ये जे पळाले. ज्यांनी सतत रड गाण गायलं आणि स्वत:ला वाचवण्यासाठी पळाले, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव घेण्याच्याही लायकीचे नाही आहेत, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 Shiv Sena Thackeray Group Leader Aaditya Thackeray Slams CM Eknath Shinde Shiv Sena In Kolhapur)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी कोल्हापुरात जाहीर सभा झाल्यानंतर रविवारी आदित्य ठाकरे यांची सभा होत आहे. त्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून शिंदे गटासह भाजपवर गंभीर आरोप केले. “मी त्यांच्याकडे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना) जास्त लक्ष देत नाही. मला वाटतं जे पळाले, कोणत्या स्थितीत पळाले, कशासाठी पळाले, जॉइन ऑर जेल पॉलिसीमध्ये जे पळाले. ज्यांनी सतत रड गाण गायलं आणि स्वत:ला वाचवण्यासाठी पळाले, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव घेण्याच्याही लायकीचे नाही आहेत. जे डरपोक आहेत, ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ शकत नाही. दोन अडीच वर्ष त्यांनी सत्तेत जे काही केलं, त्यामुळेच त्यांना पळावं लागले”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : लोकसभेच्या प्रत्येक टप्प्यात पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात; हाच मराठा समाजाचा विजय – मनोज जरांगे

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना बाजूला ठेवून सरकार स्थापन करणार होते, असा प्रश्न विचारला असता त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, “या आरोपावरही आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं. संजय राऊतच स्वत: मोठा मोर्चा लढत आहे. संजय राऊत जेलमध्ये जाऊन आले. या डरपोक लोकांसारखे त्यांनी केले नाही. बाहेर आल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम निष्टावंत राहिले”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आदित्य पुढे म्हणाले “गेल्या अडीच वर्षात दिल्लीतून फोन आले हे खरंय, पण फोन आल्यानंतर सर्व उद्योगपत्यांना गुजरातला जावं लागलं. मागील पाच वर्षांच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आणि अडीच वर्ष भाजप प्रणित शिंदेंचे सरकार आहे. या शिंदें सरकारच्या काळात आपल्या राज्यात एक तरी नवा उद्योग आला आहे का? जे उद्योग होते ते पळवले आणि जे येणार होते ते सुद्धा पळवले”

“शेतकरी सध्या त्रस्त आहेत, महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे कुठेही हे सराकर आहे, असे वाटत नाही, नुसतं खोक्यांच्या वाटा-घाटी आणि देण्या-घेण्यात व्यस्त आहे”, असा टोलाही यावेळी आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या सरकारला लगावला.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : कोकणात प्रत्यक्ष मोदी उभे राहिले तरी…, संजय राऊतांचा निशाणा

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -