Thackeray vs Thackeray : बिनशर्त पाठिंब्याचे नाटक…, नाव न घेता उद्धव ठाकरेंचा भावाला टोला

Thackeray vs Thackeray : बिनशर्त पाठिंब्याचे नाटक…, नाव न घेता उद्धव ठाकरेंचा भावाला टोला

बिनशर्त पाठिंब्याचे नाटक..., नाव न घेता उद्धव ठाकरेंचा भावाला टोला

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. याच मुद्द्यावरून मविआच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अगदी एका वाक्यात राज ठाकरे यांना त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून टोला लगावला आहे. पण यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेताच टीका केली आहे. जळगाव येथील बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी आज शनिवारी (ता. 13 एप्रिल) मातोश्री येथे ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray criticizes Raj Thackeray for supporting Mahayuti)

आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी नाव न घेता एका वाक्यात टीका करताना म्हटले की, बिनशर्त पाठिंबा देणाऱ्यांचे कौतुक करतो, पण काही जण लढण्याचे नाटक करून पाठिंबा देत आहेत, असा टोलाच ठाकरेंनी आपल्या भावाला लगावला आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : पाच वर्षे काम करा आणि…, शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांना सुनावले खडेबोल

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा होणार आहेत की नाही, याबाबत उत्तर देताना महायुतीवर निशाणा साधला. मविआच्या राज्यात लवकरच एकत्रित सभा होणार आहेत. महायुतीच्या सभा जरी सुरू झाल्या असल्या तरी त्यांचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही. उमेदवारांचा पत्ता नाही आणि सभा होत आहेत, याला काही अर्थ नसल्याचे सांगत त्यांनी महायुतीवर टीकास्त्र डागले.

भाजपाची ओरिजिनल लोक कुठे?

भाजपा एवढी लोकं भाड्याने का घेत आहे? इंजिनाची चाक निखळून स्टेपनीवर जात आहे का?? तुमची ओरिजिनल लोक होती ती कुठे गेली? आज माझ्याकडे भाजपाची लोक येत आहेत, कारण ती त्यांना म्हणजेच भाजपाला कंटाळली आहेत. त्याचा विचार पक्षाच्या हितासाठी त्यांच्या नेतृत्वाने करावा. कधी एकेकाळी मी त्यांचा मित्र होतो. त्यांनी आपला चेहरा आरशात पाहावा. एवढ्या मेकअपची गरज का लागते याचा विचार करा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

हेही वाचा…Sanjay Raut : राजकारण आम्हालाही कळते…, राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले

First Published on: April 13, 2024 4:33 PM
Exit mobile version