घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : पाच वर्षे काम करा आणि..., शालिनी पाटलांनी नातू...

Lok Sabha 2024 : पाच वर्षे काम करा आणि…, शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांना सुनावले खडेबोल

Subscribe

मविआच्या जागा वाटपात सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला सुटलेली असली तरी यामुळे सांगलीतील काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सांगली : महाविकास आघाडीमध्ये आणि प्रामुख्याने काँग्रेसमध्ये सांगली लोकसभेवरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. मविआचे जागावाटप झाले असून त्यामध्ये सांगली लोकसभा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे. मात्र, यामुळे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या नाराजीमुळे मविआत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, या नाराजी नाट्यावरून आता विशाल पाटील यांच्या आजी म्हणजेच महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी नातवाला खडेबोल सुनावले आहेत. (Lok Sabha Election 2024 Shalini Patil slams Vishal Patil regarding Sangli Constituency)

विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू असल्याने त्यांचे सांगलीच्या राजकारणात वजन आहे. त्याशिवाय ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देखील आहेत. ज्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा उत्तम प्रभाव आहे. त्याचमुळे की काय त्यांनी सांगली लोकसभेवर दावा सांगून मविआत मोठा तिढा निर्माण केला आहे. पण याबाबत आता शालिनी पाटील यांनी आपले मत व्यक्त करत विशाल पाटील यांचे कोन टोचले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शालिनी पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raj Thackeray : पंतप्रधान मोदींना पाठिंबा का? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

यावेळी शालिनी पाटील म्हणाल्या की, मला वाटते चंद्रहार पाटील निवडून येऊ शकतात. मात्र मी विशाल पाटलांबाबत काही बोलले नाही. चंद्रहार पाटील योग्य उमेदवार आहेत असे मला वाटते. राहिला विषय विशाल पाटलांच्या उमेदवारीचा तर त्याला आता उशीर झाला आहे. तो विषय आता फार पुढे गेला आहे. निवडणूक आता मतदानाच्या टप्प्यात आली आहे. चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

तसेच, चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, या निर्णयाला महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनीदेखील मान्यता दिली आहे. दिल्लीचे नेतृत्वदेखील याबाबत फेरविचार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे उमेदवारी मिळायला आता फार उशीर झाला आहे. जो कोणी चंद्रहार पाटलांच्या विरोधात उभा राहू इच्छितो त्या इच्छुक नेत्याला मला ज्येष्ठतेच्या नात्याने एवढाच सल्ला द्यायचा आहे की, ते काही माझे मित्र किंवा शत्रू नाहीत. इच्छुक उमेदवाराला मी सांगेन की, उमेदवारी हवी असेल तर पाच वर्षे अगोदरच तयारी करावी लागते, असे म्हणत त्यांनी आपल्याच नातवाचे म्हणजे विशाल पाटील यांचे कान टोचले आहेत.

तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी कामे करावी लागतात. तुम्ही तुमच्या घरातल्या कार्यालयात बसून निवडणुकीला उभे राहू शकत नाही. उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही केवळ कोणाचेतरी नातेवाईक असणे पुरेसे नाही. तुम्ही तुमच्या मतदारसंघात पाच वर्षे काम केलेले असायला हवे. पाच वर्षे लोकांशी संपर्क ठेवायला हवा. लोकांची कामे करून तुम्ही निवडणुकीच्या काळात लोकांसमोर गेलात, तुमच्या कामांद्वारे पुढे आलात तर लोकांचे तुमच्याबद्दल चांगले मत तयार होते. लोकांचं तुमच्याबद्दल चांगले मत तयार झाल्यानंतर तुम्ही काँग्रेसकडे तिकीट मागायला हवे, असा टोलाच त्यांनी विशाल पाटील यांना लगावला आहे. तर, अशा वेळी पक्षदेखील तुमच्याबद्दल विचार करतो. पाच वर्षे काम करा आणि पक्षाने तिकीट दिले तर निवडणुकीला उभे राहा. अपक्ष निवडणूक लढण्यात काही अर्थ नाही, असा सल्लाही शालिनी पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा…, राऊतांची पंतप्रधान मोदींच्या विधानावर सडकून टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -