घरमहाराष्ट्रSanjay Raut : राजकारण आम्हालाही कळते..., राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले

Sanjay Raut : राजकारण आम्हालाही कळते…, राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटावर नवा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीसोबत 20 जागा फिक्स केल्या आहेत, असा नवा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यांच्या या आरोपाला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांना आमच्यावर नवीन आरोप करायची सवय आहे. पण त्यांनी ज्या 20 जागांबाबत मत व्यक्त केले आहे, तिथे आम्ही भाजपाचा दारुण पराभव करणार आहोत, त्यांना सांगा की राजकारण आम्हालाही कळते, असा टोला राऊतांनी आंबेडकरांना लगावला आहे. (Sanjay Raut reply to Prakash Ambedkar allegations)

आज शनिवारी (ता. 13 एप्रिल) प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी जे सांगितले की, आम्ही 20 जागांवर भाजपासोबत फिक्सिंग केली आहे, म्हणजेच आम्ही त्यांचा दारुण पराभव करणार आहोत. तिथे भाजपानेही आपला पराभव मान्य केला आहे. राजकारण आम्हाला देखील कळते, देशाचे संविधान जास्त आम्हाला कळत आहे, कारण आम्ही तो संघर्ष करत आहोत, असा टोला राऊतांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : विदर्भात काँग्रेसच्या प्रचाराचा झंझावात, राहुल गांधींची शनिवारी भंडाऱ्यात सभा

तसेच, या महाराष्ट्रात आम्ही प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत राहावे, यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांना विनवण्या केल्या. प्रेमाने हात देखील जोडले. आपण चळवळीचे नुकसान करू नये, अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांना सांगितले. संविधान रक्षणासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्टेसाठी महाविकास आघाडीबरोबर आपण यावे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आमच्याबरोबर यावे, ही आमच्या सर्वांची भूमिका होती, पण ते आमच्यासोबत आले नाहीत, अशी खंत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

तर, प्रकाश आंबेडकर यांनी ज्या जागा मागितल्या होत्या, त्यातील सहा जागा आम्ही त्यांना देऊ केल्या होत्या. हे जर का मी खोटे बोलत असेल तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांना याबाबत विचारावे, ते तुम्हाला सांगतील. वंचित बहुजन आघाडीबाबत तर पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत परखड वक्तव्य केले आहे. सर्वांनी त्यांना सोबत येण्याची विनंती केली होती. पण ते सोबत आले नाहीत ही त्यांची इच्छा आहे. पण त्यांच्याविषयी आमच्या मनात कायम आदरभाव असणार आहेत. आज जरी ते सोबत नसले तरी निवडणुकीनंतर ते सोबत येतील असा विश्वास व्यक्त करत खासदार राऊत यांनी मविआचे दरवाजे वंचितसाठी खुले असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : संजय मंडलिकांना विजयी करण्यासाठी धनंजय महाडिकांची मतदारांना ऑफर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -