मुंबई, ठाणे, पालघरमध्ये युतीचे बालेकिल्ले टिकणार की जाणार

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये युतीचे बालेकिल्ले टिकणार की जाणार

election

आज मतदार राजा ठरवणार अनेकांचे भवितव्य
मुंबईतील सहा मतदारसंघ तसेच ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मावळ आणि शिरूरमध्ये सोमवारी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. विशेष म्हणजे हे बाराही मतदारसंघ सध्या भाजप-शिवसेना युतीकडे आहेत. त्यामुळे हे मतदारसंघ युतीचे बालेकिल्ले मानले जातात. मात्र यावेळी महायुती आणि महाआघाडी यांच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा थंड पडल्यानंतर प्रत्यक्षात मतदार आता कुणाच्या झोळीत मतांचे दान टाकते याकडे सर्वांचे लक्ष असून सर्वच उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतपेटीत बंदिस्त होणार आहे. युती आपले सर्व मतदारसंघ टिकवणार की, महाआघाडी बाजी मारणार हे ठरवण्यासाठी मतदारराजा सोमवारी मतदान करणार आहे. मुंबईतील सहा मतदार संघात ज्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार विजयी होतात, त्या पक्षाचा पंतप्रधान होतो हा इतिहास आहे. त्यादृष्टीने मुंबईतील मतदानावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असते.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये आज राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे.3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरूष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत.मुंबई उत्तर मतदार संघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत.मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

या लोकसभा मतदारसंघामध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदार संघ केंद्रे आहेत.सुमारे 1 लाख हजार 995 ईव्हीएम ( बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये 31 मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले.शेवटच्या टप्प्यात होणार्‍या मतदानासाठी तयारी सुरू झाली आहे.मतदान केंद्रांवर आवश्यक असणार्‍या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.‘सखी मतदान केंद्र,दिव्यांग मतदार केंद्र,दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर,पिण्याच्या पाण्याची सुविधा,सावलीसाठी मंडप अशा सोयी यापूर्वी मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या.

नंदुरबार(अ.ज.),धुळे,दिंडोरी(अ.ज.),नाशिक,पालघर,(अ.ज.),भिवंडी,कल्याण,ठाणे,मुंबई- उत्तर,मुंबई -उत्तर पश्चिम,मुंबई उत्तर-पूर्व,मुंबई उत्तर-मध्य,मुंबई दक्षिण-मध्य,मुंबई दक्षिण,मावळ,शिरूर आणि शिर्डी ( अ.जा.) या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

देशात ७२ मतदारसंघात आज मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी देशातील नऊ राज्यांमध्ये ७२ मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. या टप्प्यात बिहार-५, जम्मू-काश्मीर -१, झारखंड -३, मध्य प्रदेश -६, महाराष्ट्र -१७, ओडिशा -६, राजस्थान-१३, उत्तर प्रदेश -१३ आणि पश्चिम बंगाल -८ या मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव, मून मून सेन, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह या दिग्गजांसह ९४३ उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

दक्षिण मुंबई

अरविंद सावंत v/s मिलिंद देवरा
एकूण मतदार: १५ लाख ५३ हजार
पुरुष मतदार : ६ लाख ९९ हजार
महिला मतदार : ८ लाख ५४ हजार
प्रथम मतदार : १० हजार ८६

दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे v/s एकनाथ गायकवाड
एकूण मतदार : १४ लाख ४० हजार
पुरुष मतदार : ७ लाख ७१ हजार
महिला मतदार : ६ लाख ६२ हजार
प्रथम मतदार : १४ हजार ७

उत्तर-मध्य मुंबई
पूनम महाजन v/s प्रिया दत्त
एकूण मतदार : १६ लाख ७९ हजार
पुरूष मतदार : ९ लाख १६ हजार
महिला मतदार : ७ लाख ६३ हजार
प्रथम मतदार : १० हजार ७५५

उत्तर- पश्चिम मुंबई
गजानन कीर्तीकर v/s संजय निरुपम
एकूण मतदार : १७ लाख ३२ हजार
पुरुष मतदार : ९ लाख ५० हजार
महिला मतदार : ७ लाख ८१ हजार
प्रथम मतदार : १४ हजार ७३०

उत्तर-पूर्व (ईशान्य) मुंबई
मनोज कोटक v/s संजय पाटील
एकूण मतदार: १५ लाख ८८ हजार
पुरुष मतदार: ८ लाख ६४ हजार
महिला मतदार : ७ लाख २३ हजार
प्रथम मतदार : १२ हजार ९

उत्तर मुंबई
गोपाळ शेट्टी v/s उर्मिला मातोंडकर
एकूण मतदार : १६ लाख ४७ हजार
पुरुष मतदार : ८ लाख ९० हजार
महिला मतदार : ७ लाख ५६ हजार
प्रथम मतदार : ११ हजार ५४२

ठाणे
राजन विचारे v/s आनंद परांजपे
एकूण मतदार : २० लाख ७३ हजार ४४२
पुरुष मतदार : ११ लाख ४२ हजार १५८
महिला मतदार : ९ लाख २८ हजार ११२
प्रथम मतदार : १९ हजार २३१

कल्याण
डॉ. श्रीकांत शिंदे v/s बाबाजी पाटील
एकूण मतदार: १९ लाख ६५ हजार १३१
पुरुष मतदार : १० लाख ६१ हजार ३८६
महिला मतदार : ९ लाख ३ हजार ४७३
प्रथम मतदार : १६ हजार ११२

भिवंडी
कपिल पाटील v/s सुरेश टावरे
एकूण मतदार:१८ लाख ८९ हजार ७८८
पुरुष मतदार: १० लाख ३७ हजार ७५२
महिला मतदार: ८ लाख ५१ हजार ९२१
प्रथम मतदार: १७ हजार २८३

पालघर
राजेंद्र गावित v/s बळीराम जाधव
एकूण मतदार: १८ लाख ८५ हजार २९७
पुरुष मतदार: ९ लाख ८९ हजार
महिला मतदार: ८ लाख ९६ हजार १७८
प्रथम मतदार : १६ हजार ०३०

मावळ
श्रीरंग बारणे v/s पार्थ पवार
एकूण मतदार: २२ लाख ९७ हजार ४०५
पुरुष मतदार: १२ लाख २ हजार ८९४
महिला मतदार: १० लाख ९४ हजार ४७१
प्रथम मतदार : १९ हजार ०४९

शिरुर

शिवाजीराव अढळराव v/s डॉ. अमोल कोल्हे
एकूण मतदार: २१ लाख ७३ हजार ५२७
पुरुष मतदार: ११ लाख ४४ हजार ८२७
महिला मतदार: १० लाख २८ हजार ६५६
प्रथम मतदार: २० हजार २३१

First Published on: April 29, 2019 4:39 AM
Exit mobile version