पुण्यात वसंत मोरेंची महाआरती, राज ठाकरे पुण्यात दाखल

पुण्यात वसंत मोरेंची महाआरती, राज ठाकरे पुण्यात दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे नुकतेच पुण्यात दाखल झाले आहेत. राज ठाकरे आपल्या वैयक्तिक कारणासाठी पुण्यात आले आहेत. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे राज ठाकरे यांच्या राजमहल या निवासस्थानी पोहचले. तसेच मनेसेचे पदाधिकारी देखील राज ठाकरेंच्या स्वागतासाठी राजमहल या निवासस्थानी उपस्थित होते. राज ठाकरे पुण्यामध्ये असतानाच पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची महाआरती असणार आहे. वसंत मोरे यांनी महाआरतीचे आयोजन केले आहे. मात्र वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या या महाआरतीला राज ठाकरे जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पुणे येथील कात्रजमध्ये हनुमान मंदिरात राज ठाकरे आज सायंकाळी महाआरती करणार आहेत. त्यांचा पुण्यात तीन दिवस मुक्काम असणार आहे, त्यामुळे आगामी काही दिवसांत मनसेच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

राज ठाकरे यांच्या महाआरतीसाठी मनसेने पुण्यातील कात्रज येथील कार्यालयासमोर जय्यत तयारी सुरु केली आहे. यासाठी पक्षाचे महत्वाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे हे कटाक्षाने लक्ष देत आहेत. मंदिरासमोर व्यासपीठही उभारण्यात आले असून भगव्या रंगात सजावटीचे कामही सुरु झाले आहे.

वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून यासंदर्भात माहिती दिली आहे. आज कात्रजला संध्याकाळी सहा वाजता ऑफिस समोरील हनुमान मंदिरात मी महाआरती करतोय. यावं तर लागतयचं नक्की या मी वाट बघतोय, असा मजकूर या पोस्टमध्ये लिहला आहे. तसेच बॅनर्स लावून महाआरतीच्या कार्यक्रमाची जाहिरातही करण्यात आली आहे. त्यामुळे आता या महाआरतीच्या मुद्द्यावरून पुण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनीही या महाआरतीला परवानगी दिली आहे.


हेही वाचा : Asaduddin Owaisi: मुस्लिमविरोधी दंगलीचा मार्ग न्यायालय खुला करतंय – असदुद्दीन ओवैसी


 

First Published on: May 7, 2022 7:00 PM
Exit mobile version