Chhatrapati Shivaji Maharaj Raigad : शिवभक्तांनी आठवला शिवरायांचा प्रताप

Chhatrapati Shivaji Maharaj Raigad : शिवभक्तांनी आठवला शिवरायांचा प्रताप

महाड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४४ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज (२३ एप्रिल) शिवभक्तांनी त्यांना किल्ले रायगडावर मानवंदना दिली. किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याचा साक्षीदार! याच किल्ले रायगडावर शिवरायांनी आपला देह ठेवला म्हणून भावपूर्ण वातावरणात शिवभक्तानी त्यांना मानवंदना देत त्यांचा प्रताप आठवला. या निमित्ताने शिवसमाधीस्थळी विधिवत पूजा करण्यात आली. श्री जगदीश्वर मंदिरात दीपवंदना, रात्र शाहिरांची या कार्यक्रमासोबतच हरिपाठ, इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

पुण्यतिथीच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्री जगदीश्वराची पूजा केल्यानंतर हनुमान जयंती उत्सव किर्तन, शिवसमाधी महापूजा, राजदरबारातील शिवप्रतिमा पूजन त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी हिंदू जनमानसाला जोडणारा दुवा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशात ओळखले जाते, असे मत व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर यांनी छत्रपतींना देवत्व प्राप्त झाले होते, या शब्दांत शिवरायांच्या कार्याचा गौरव केला.

हेही वाचा… Raigad Gairan land News : 99 हेक्टर गायरान जमिनींवर खासगी कब्जे

प्रतिवर्षाप्रमाणे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे, स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४४ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त किल्ले रायगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड गडारोहन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, सरसेनापती प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याचे वंशज तसेच एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर, मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम आदी पस्थित होते.

हेही वाचा… Raigad Dhatav MIDC Fire : धाटावमधील आगीनंतर अनेक कारखाने बंद

पुन्हा मानवंदना?

किल्ले रायगडावरील राजदरबारात दहा वर्षांपूर्वी सुरू असलेली पोलीस दलाची मानवंदना पुन्हा सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार. – भरत गोगावले, आमदार, महाड

First Published on: April 23, 2024 8:44 PM
Exit mobile version