Teachers Day : महाराष्ट्रातील 3 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Teachers Day : महाराष्ट्रातील 3 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्ताने आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ठ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. (Maharashtra 3 teachers honored with National Teacher Award by president of India Droupadi Murmu)

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार यंदाही देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देत सन्मान करण्यात आला.

महाष्टारातील 3 शिक्षकांचा सत्कार

कविता संघवी, प्राचार्य, चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल, मुंबई, महाराष्ट्र
शशिकांत संभाजीराव कुलथे, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामुनाईक तांडा, बीड, महाराष्ट्र
सोमनाथ वामन वाळके, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा पारगाव जोगेश्वरी, बीड, महाराष्ट्र

कविता संघवी, शशिकांत संभाजीराव कुलथे आणि सोमनाथ वामन वाळके या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊस सत्कार करण्यात आला.

एकनाथ शिंदेंचा शिक्षकांशी ऑनलाईन संवाद

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार, राज्यात सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी “हे तुमचं आमचं सर्वच सरकार आहे. शिक्षणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधींची कमतरता पडू देणार नाही. शिक्षकांनी ज्या काही सूचना केल्या त्याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल. तसेच शिक्षकांचे पगार वेळेवर झाले पाहिजे त्यासाठी शिक्षण विभागाला आदेश देणार आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – मिशन 150 : मुंबईवर भाजपाचे वर्चस्व असावे; अमित शाहांचा शिंदे गटालाही शह

First Published on: September 5, 2022 3:52 PM
Exit mobile version