Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभेत शक्ती विधेयक एकमतानं मंजूर

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभेत शक्ती विधेयक एकमतानं मंजूर

अ‍ॅसीड हल्ला किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेला आणि त्यासाठी विशेष न्यायालयांच्या स्थापनेबाबतचा शक्ति कायद्याचे विधेयक विधानसभेत गुरुवारी एकमतानं मजूंर झालं. राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित शक्ती कायदा लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मुंबईतील साकीनाका येथील बलात्काराच्या घटनेनंतर राज्य सरकारने सुधारित शक्ती कायदा लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. या कायद्या संदर्भातील विधेयकाला आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत सर्वानुमते मान्य करण्यात आलं आहे.

विधानसभेत शक्ती कायद्याचं विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर ते मंजूरीसाठी विधानपरिषदेत ठेवलं जाणार आहे. या विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. तिथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित विधेयकाचं कायद्यात रुपांतर होऊन तो कायदा राज्यात लागू होईल.

शक्ती कायद्यात काय आहेत तरतुदी?

First Published on: December 23, 2021 5:03 PM
Exit mobile version