वाँटेड माओवादीला नालासोपाऱ्यातून अटक; महाराष्ट्र एटीएसची पहाटे कारवाई

वाँटेड माओवादीला नालासोपाऱ्यातून अटक; महाराष्ट्र एटीएसची पहाटे कारवाई

वसई, विशेष प्रतिनिधी : झारखंड राज्यात सक्रीय असलेल्या सीपीआयच्या (माओवादी) या नक्षलवादी संघटनेच्या सदस्याला महाराष्ट्र एटीएसने रविवारी पहाटे नालासोपाऱ्यातील धानीव परिसरातून अटक केली. कारू हुलास यादव (४५) असे त्याचे नाव आहे. झारखंड पोलिसांनी त्याच्यावर पंधरा लाखांचे बक्षिसही लावले होते.

कारू यादव हा मूळचा झारखंडमधील हाजीरबाग जिल्ह्यातील दोडगा गावातील आहे. झारखंडमध्ये बंदी असलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचा तो २०१४ पासून सक्रीय सदस्य आहे. झारखंड पोलीस गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर होते. त्याला पकडून देणाऱ्याला पंधरा लाखांचे बक्षिसही जाहिर करण्यात आले होते.

महाराष्ट्र वैद्यकीय उपचारासाठी आल्याची माहिती झारखंड पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. त्यावरून एटीएस त्याचा शोध घेत होते. यादव नालासोपारा पूर्वेकडील धानीब वाग परिसरातील रामनगर चाळीत असल्याची माहिती मिळाल्यावरून एटीएसच्या पथकाने रविवारी पहाटे याठिकाणी छापा मारला. त्यावेळी यादव एटीएसच्या हाती लागला.


राजकीय दबावामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला; जयंत पाटलांचा आरोप

First Published on: September 18, 2022 2:01 PM
Exit mobile version