Maharashtra Bandh : केंद्रीय मंत्री अजय मिश्रांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – नाना पटोले

Maharashtra Bandh : केंद्रीय मंत्री अजय मिश्रांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – नाना पटोले

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली असून त्याला चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. दरम्यान, आज काँग्रेसने राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन पुकारलं असून त्याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री आशिष मिश्रा यांची मंडिमंडळातून हकालपट्टी करावी, असी मागणी नाना पटोले यांनी काँग्रेसच्यावतिने केली.

“लखीमपूर येथे केंद्रातल्या गृह राज्यमंत्री ज्यांच्यावर खुनाचे हायकोर्टात खटला सुरु आहे, त्यांच्यावर नेपाळ आणि भारतात स्मगलिंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. अशा अजय मिश्रा नावाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं. त्या घटननंतर आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. त्यांना किडनॅप करण्यात आलं. कुठल्याही कोर्टासमोर त्यांना हजर न करता ज्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं गळा घोटण्याचं काम केलं ते देशातील लोकांनी पाहिलं. आशिष मिश्रा या आरोपीला अटक तर केली मात्र त्याला न्यायालयिन कोठडीत टाकणं म्हणजेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्यावर ३०२ अंतर्गत तातडीनं कारवाई व्हावी,” अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना तातडीनं मंत्रिमंडळातून काढण्यात यावं ही मागणी आज काँग्रेसच्या वतिनं संपूर्ण देशभरात केली जात आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिलेली आहे. आज त्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाले आहेत. कारण भाजपचं सरकार केंद्रात आल्यानंतर व्यापाऱ्यांनाही जीएसटीच्या माध्यमातून चिरडण्याचं काम भाजपकडून सुरु झालेलं आहे. व्यापारी, अनेक उद्योग त्यांनी पण या बंदमध्ये सहभागी झाले आहेत, त्यांचे आभार मानतो. तसंच, राज्यातील जनता या बंदमध्ये सहभागी झाली त्यांचे देखील आभार मानतो असं म्हणत या बंदच्या माध्यमातून भाजपला एक धडा देतोय, असा इशारा भाजपला दिला.

 

First Published on: October 11, 2021 12:04 PM
Exit mobile version