पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी रवाना

पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी रवाना

Maharashtra Bhushan Award Update: ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे पुरस्कार सोहळ्यासाठी खारघरच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्य शासनाच्यावतीनं देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी श्री सदस्यांनी सकाळपासूनच सोहळ्यास्थळी अलोट गर्दी केली आहे.

या महासोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास या सोहळ्यला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले होते. सह्याद्री अतिथीगृहावरून हे तिघेही एकत्र खारघरमधील सोहळ्यास्थळी रवाना होणार असं सांगितलं जातंय. कुलाबा इथे असलेल्या ‘आयएनएस शिकरा’ या हॅलीपॅडमधून हे तिघेही सोहळ्यास्थळी एंट्री करणार असं बोललं जातंय. साधारण ११ वाजता या पुरस्कार सोहळ्याला सुरूवात होणार आहे.
दुसरीकडे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे सुद्धा त्यांच्या निवासस्थानाहून खारघरच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित आहेत.

अध्यात्माची लहानपणापासून आवड
डॉ. दत्तात्रय धर्माधिकारी यांचा जन्म १५ मे १९४६ रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. भजन, कीर्तन, अध्यात्माची आवड त्यांनी लहानपणापासून होती. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचा वसा ते वाहून नेत आहेत. समाजाच्या सेवेसाठी डॉ.आप्पासाहेब यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. गेली ३० वर्षे ते निरुपण करत आहेत. बालमनावर संस्कार करत असतात. त्यासाठी त्यांनी बालसंस्कार बैठकी घेतल्या. त्यातून बालकांवर चांगले संस्कार केले. नव्या पिढीला मार्गदर्शन केले. त्यातून चांगली समाजनिर्मिती झाली. आदिवासी पाड्या, वस्त्या या ठिकाणी त्यांनी व्यसनमुक्तीचे कार्य केले. निर्माल्यातून खत निर्मिती केली. त्यातून पर्यावरण पुरक संदेश त्यांनी समाजाला दिला. आप्पासाहेब हे स्वच्छतादूत म्हणून ओळखले जातात. वडील नानासाहेब यांचे कार्य ते जोमाने करत आहेत.

एकाच मैदानात दोनदा पुरस्काराचा मान

नानासाहेबांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांच्या निधनानंतर याच मैदानामध्ये आप्पासाहेबांनी नानासाहेबांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला होता. त्यानंतर पुन्हा याच मैदानात आज २०२२ चा महाराष्ट्र भूषण आप्पासाहेबांना देण्यात आला. हा योगायोग असल्याचं सांगितलं जात आहे.

First Published on: April 16, 2023 10:59 AM
Exit mobile version