Maharashtra SSC Exam: १०ची परीक्षा रद्द, मात्र १२वीची परीक्षा होणार – राजेश टोपे

Maharashtra SSC Exam: १०ची परीक्षा रद्द, मात्र १२वीची परीक्षा होणार – राजेश टोपे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आज मंगळवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. येत्या काही तासांत राज्यात लॉकडाऊन लावला जाईल असा सुतोवाच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द होणार (maharashtra ssc board exam 2021 cancelled)
असून बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, ‘मंत्रीमंडळामध्ये दहावी परीक्षा रद्द करण्याबाबत आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत एकमताने निर्णय झालेला आहे. याबाबत सविस्तर लवकरच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड माहिती देतील.’

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड? 

‘कोरोना वाढत असल्याचे पाहून १२ एप्रिलला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता. यासंदर्भात आम्ही इतरही बोर्डाला सांगितले होते आणि परीक्षाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की, दहावीच्या परीक्षा रद्द कराव्यात आणि बारावीच्या परीक्षा घ्याव्यात. याचप्रमाणे राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनानुसार पास करण्यावर आम्ही चर्चा करून अंतिम निर्णय देऊ,’ अशी माहिती आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


हेही वाचा – राज्यात काही तासातच लॉकडाऊन लागणार, नवीन नियमावली होणार जाहीर


 

First Published on: April 20, 2021 6:22 PM
Exit mobile version