घरताज्या घडामोडीराज्यात काही तासातच लॉकडाऊन लागणार, नवीन नियमावली होणार जाहीर

राज्यात काही तासातच लॉकडाऊन लागणार, नवीन नियमावली होणार जाहीर

Subscribe

काही तासात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार - अस्लम शेख

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते परंतु नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. आज राज्यातील कोरोना परिस्थितीवर कॅबिनेट बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनवर चर्चा करण्यात आली आहे. येत्या काही तासानंतर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. याबाबत नियावलीही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध आणले तरीही राज्यात केसेस कमी होत नाही. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत असल्यामुळे रुग्णालयात बेड मिळत नाही आहे. कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत भरपूर चर्चा केल्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन लावण्यावर चर्चा करण्यात आली असल्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन संदर्भात कठोर निर्बंध लागू केले, जवळपास नाईट कर्फ्यू लावून ८० टक्के बंद करण्यात आले आहे. परंतु तरिही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. याबाबत काही तासात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येतील असेही पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

राज्यात लॉकडाऊनची गरज – एकनाथ शिंदे

मागील वर्षी केलेला लॉकडाऊन विचार न करता केला होता. परंतु आताच्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याबाबत विचार केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा केली आहे. राज्यातील परिस्थिती भीषण झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ही चेन तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याची आवश्यकता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्यांचे लॉकडाऊनबाबत एकमत झाले आहे. जनतेच्या मनातीलही हीच भावना आहे. रुग्णांचा उपचाराविना मृत्यू होत आहे. कोरोनाची चेन ब्रेक करायची असेल तर राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज आहे. तसेच १०० मेट्रिक टन ऑक्सिजन प्लांट तयार करावा हा प्लांट आपल्याला पुढेही उपयोगी पडणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

परदेशातून लस आणण्याची केंद्राकडे मागणी – जितेंद्र आव्हाड 

महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. लॉकडाऊनबाबत ही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी परदेशात तयार झालेल्या सर्व लसींना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारने लवकर परवानगी द्यावी अशी मागणी मंत्रिमंडळाने एकताने मोदी सरकारला कळवण्याचे ठरवले आहे. यामुळे राज्यातील कोरोना परिस्थिती रोखण्यासाठी मदत होईल असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -